राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

मुंबई | Mumbai

राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते...

आज झालेल्या बैठकीत शेतजमिनीच्या (Agricultural Land) ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना (Reconciliation Scheme) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियान (Jalyukta Shivar Abhiyan) २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत. त्याचबरोबर काही महत्वाचे निर्णय देखील मंत्रिमंडळाने घेतले आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील महत्वाचे निर्णय घेण्यात आले

महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. 'ईज ऑफ डुईंग बिझिनेस' साठी निर्गुन्हेगारीकरण करणार.

राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता.

जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता.

आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता.

राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार.

गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय.

राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com