राज्य मंत्रिमंडळाचे सिन्नरकरांना मोठे गिफ्ट

राज्य मंत्रिमंडळाचे सिन्नरकरांना मोठे गिफ्ट

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीमध्ये राज्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला (Sinnar) मोठे गिफ्ट मिळाले आहे...

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (Civil Court) (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु करण्यास उच्च न्यायालयाने (High Court) दोन वर्षांपूर्वी मंजूरी दिली होती. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे न्यायलय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या नव्या न्यायालयामुळे हिंदू विवाह कायद्यांतर्गत येणारे सर्व दावे सिन्नरलाच चालू शकणार आहेत. तर पाच लाखांपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या मालमत्तांबाबतचे दावेही सिन्नरला चालविण्याचा मार्ग आता न्यायालय स्थापन झाल्यास मोकळा होणार आहे.

तसेच सरकारच्या विरोधात दावा दाखल करण्यासाठी सिन्नरकरांना नाशिकला यावे लागत होते. मात्र, या नव्या न्यायालयामुळे आता सिन्नरकरांना शासनाच्या विरोधात येथेच न्याय (Justice) मागता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com