Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Budget Session : लव्ह जिहादवरून विधानसभेत खडाजंगी

Maharashtra Budget Session : लव्ह जिहादवरून विधानसभेत खडाजंगी

मंगल प्रभात लोढा यांनी माफी मागावी- अबू आझमीलव्ह जिहादप्रकरणाची चुकीची आकडेवारी दिल्यावरून सभागृहात गोंधळलव्ह जिहादवरून विधानसभेत खडाजंगीबजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा, शेतकऱ्यांना मिळाला भोपळा, कामगारांना मिळाला भोपळा,….  विरोधकांचे भोपळा घेऊन पायऱ्यांवर आंदोलन विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन सुरु केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार भोपळा घेऊन विधान भवनात प्रवेश करत आहेत. विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.उद्धव ठाकरे विधान परिषदेत दाखल

अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rain) राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख आणि विधान परीषद आमदार उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता विधान भवनात येणार आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघीडीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत.तक्रारदाराने धाडस दाखवून तक्रार केली. त्यामुळे त्याला संरक्षण दिलं पाहिजे. त्याच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, हे पोलीसही मान्य करतात. त्यामुळे त्याला पूर्ण संरक्षण दिलं पाहिजे. हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करणाऱ्याला योग्य प्रायश्चित देणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळतील, असं मला वाटत नाही. जो गुन्हेगार असेल त्याचा पिच्छा पुरवण्याचं काम ते करतील का? किती महिन्यात गुन्हेगारांना अटक होईल? आणि राज्य सरकार किती दिवसात हडप केलेल्या हिंदू देवस्थानच्या जमिनी परत देवस्थांनांना मिळवून देईल?

- Advertisement -

– जयंत पाटीलहे प्रकरण फार गंभीर आहे. या प्रकरणात पोलीस, भ्रष्टाचार विरोधी विभाग वेळकाढूपणा करत आहे. हे प्रकरण पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एसीबीने बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी केली आहे का? आरोपींविरोधात तपास अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली?

– जयंत पाटीलसरकार बदलल्यावर तक्रारदाराचं निशुल्क संरक्षण काढून टाकण्यात आलं. तसेच तक्रारदारावर अहमदनगरमध्ये पॉक्सोअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे तक्रारदाराला संरक्षण देण्याचं राहिलं, त्याचं संरक्षण काढण्यात आलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातून तक्रारदाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला.

– जयंत पाटीलबीडमध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पिंपळेश्वर महादेव देवस्थान, विठोबा देवस्थान, रामचंद्र देवस्थान अशा हिंदू देवांच्या मंदिराच्या ट्रस्टची जमीन हडप करण्याचा मोठा प्रकार झाला आहे. हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही याची मला खात्री आहे. पिंपळेश्वर महादेव ट्रस्टमध्ये एका दुधसंघाच्या कर्मचाऱ्याच्या नावाने ५०-६० एकर जमीन आहे. विठोबा देवस्थानाची जमीन मनोज रत्नपारखे या व्यक्तीच्या नावावर आहे. रामचंद्र देवस्थानची जमीन रोहित जोशी यांच्या नावावर वर्ग झाली.  – जयंत पाटीलविधानसभेत आज केवळ अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनीदेखील राज्यात अवकाळीमुळे बळीराजासमोर पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत आज इतर सर्व मुद्दे बाजुला करुन केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधकांची घोषणाबाजी चालू आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे अशी मागणी विरोधक करत आहेत. मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी म्हणत आंदोलन करण्यात येत आहे.सोमवार आणि मंगळवार अधिवेशनाचे कामकाज बंद होते. आजही विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा (Rain) शेती पिकांना बसलेला फटका, शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आज अजित पवार यांनी सभागृहात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या महिलांशी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला आमदार या धोरणावर आपल्या सूचना सभागृहात मांडणार आहे.विरोधी पक्षनेत्यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केलाय. काही विशिष्ट भागात एक रॅकेट सर्रासपणे चालू आहे. राज्यसरकारनं कॉपीमुक्त अभियान या परीक्षेच्या निमित्ताने सुरू केलं होतं. तरी हे प्रकरण गंभीर आहे. तात्काळ त्या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशीच्या सूचना देऊ. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत यावर निवेदन सादर करण्याची कार्यवाही करू. – विखे पाटीलसिंदखेडराजा परिसरात बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता फुटला. तो सगळीकडे प्रसिद्ध झालाय. ते रॅकेट आहे की काय आहे? अभ्यास करणाऱ्या मुलांचं किती वाटोळं आहे. सरकार काय करतंय मला काही कळत नाही. सरकार झोपलंय की काय? मग पुन्हा तुम्हा म्हणता दादा बोलतात, दादा बोलतात. हे बारावीच्या मुलांचं नुकसान आहे. मध्येही एका पेपरचं तसंच झालं – अजित पवारराज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला. या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारत असताना बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मानधन आणि अंगणवाडी मदतनीसांना दहा हजार रुपये मानधन देणार का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला होता. विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतील मग तुमच्या उत्तराला काय अधिकार, असा सवाल पवार यांनी केला.आज प्रश्नोतरच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. जवळपास 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या विभागाचे मंत्री उत्तर देत होते तेव्हा सगळेच
म्हणत होते उत्तर व्यवस्थित दिलंच नाही. या सरकारची भूमिका योग्य नाही. 100 सदस्य प्रश्न उपस्थित करून देखील मंत्री बघू बघू म्हणत असतील हे योग्य नाही.ज्या घोषणा तोंडी केल्या जातायत मात्र सरकार अंमलबजावणी करत नाहीत, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.राज्य शासनाच्या औषध प्रशासन विभागातर्फे कफ सिरफ तयार करणाऱ्या 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली असून, 17 दोषी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, 4 कंपन्यांचे उत्पादन बंद तर 6 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती औषध प्रशान मंत्री संजय राठोड यांनी दिली.विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत, याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.अंगणवाडी सेविका वेतन वाढीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 15000 हजार रुपये पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोबाईल खरेदी करण्साचा 150 कोटी खर्च केले जाणार आहे. तर मनपा क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाडी सेविका सुरु करत आहोत. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.अंगणवाडी सेविकांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी माहिती दिली आहे. 20 टक्के पगार वाढ केली जाणार आहे. तसेच मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविका भरती करणार आहोत. विधिमंडळ अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. कालचा दिवस हा मुख्यमंत्र्यांचे देशद्रोही म्हणणारच, भास्कर जाधवांचे महिन्याच्या आत जेलमध्ये टाकणार, शरद पवारांचा आमदार राम सातपुतेंनी केलेला एकेरी उल्लेख, कसब्याचा निकाल ते शेतकऱ्यांच्या बांधावरचा कांदा या मुद्द्यांनी गाजला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर आज उत्तर देणार आहेत. विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाबाबत चर्चा होणार आहे.संजय राऊत यांच्या चोरमंडळ शब्दाला शिवसेना-भाजपकडून जोरदार आक्षेप. विधिमंडळाचा अपमान झाल्याचा आरोप करत भाजप आणि शिवसेनेचे आमदार आक्रमक. कोणत्याही नेत्यांनी अशी वक्तव्ये करू नये, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन. चोरमंडळ म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. वक्तव्य तपासून पाहावे, अशी अजित पवारांची मागणी.संजय राऊत यांनी चोरमंडळ म्हणणे हा विधिमंडळाचा अपमान आहे. माझ्याकडे क्लीप आहे. ते हे गुंडमंडळ म्हणाले. या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. त्यांचे प्रकरण हक्कभंगाकडे पाठवावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली.संजय राऊत यांच्या चोरमंडळ या वक्तव्याचे विधानसभेत जोरदार प्रतिसाद उमटले. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.शिंदे आणि फडणवीस सरकारवर खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केली आहे. शिंदे (Eknash Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis ) सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Mumbai News) आज तिसरा दिवस आहे. शिवसेना (Shiv Sena Symbol) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला (Shinde Fadnavis government) दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाले आहेत. (Maharashtra Budget 2023) अधिवेशनाच्या प्रत्येक अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…
विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कांदा आणि कापसाच्या दराचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसून सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठिशी ठाम असल्याचं नमूद केलं. तसेच, सरकार कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.कांद्याप्रश्नी केंद्र सरकारसोबत चर्चा करावी-  भुजबळांची मागणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज चर्चा घ्यावी. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे. सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा. अशी मागणी अजित पवार यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केली.

सध्याचं सरकार फक्त फक्त निवडणूक प्रचार मध्ये व्यस्त आहे. त्यामुळं सरकार फक्त कागदावर काम करत आहे. कांदा आणि कापसू भाव कमी झालं तरी केंद्र सरकार ला एक पत्र लिहले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले, केंद्र व राज्य सरकार मिळून देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त करत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा पैसा मिळालाच पाहीजे. राज्यात कांदा, तूर, कापूस, सोयाबिनला हमीभाव मिळालाच पाहीजे. मात्र, राज्य सरकारचे धोरण केवळ व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे. आज अधिवेशनात याबाबत आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत.तुरुंगातून नुकतेच बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवरील आंदोलनात सहभागी झाले आहेत. कांद्याला भाव मिळालाच पाहीजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांकडून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवींचा निषेध केला जात आहे.मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे. दरम्यान राष्ट्रवादी आमदार कांद्याला भाव मिळावा म्हणून विधान भवनात कांदे घेऊन दाखल झाले आहे. इतकेच नव्हे तर विरोधकांनी गळ्यात कापूस, लसूण आणि कांद्याची माळ घातली असल्याचे पाहायला मिळाले.शोकसभेनंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित, उद्या सकाळी ११ वाजल्यानंतर सभागृह सुरू होणार, विधानपरिषदेचंही कामकाज स्थगित, उद्या दुपारी १२ वाजेनंतर सभागृह सुरू होणार दक्षिण भारतात सात भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. साडेचारशे विद्यापीठात मराठी शिकवली जाईल. आमची भाषा जुनी असूनसुद्धा दर्जा मिळालेला नाही. –  छगन भुजबळमराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – छगन भुजबळ
मिलिंद नार्वेकर यांची अनेक वर्षांपासून आमदार होण्याची इच्छा आहे. कदाचित त्यांना सर्वांसोबत संपर्क साधायचा असेल. मिलिंद नार्वेकर यांची अनेक वर्षांपासून इच्छा आहे की मी आमदार व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमदार बनवले नाही यात आमचा दोष नाही. मिलिंद नार्वेकर सगळ्यांच्या मधले दुवा आहेत. मिलिंद नार्वेकर लवकर आमच्याकडे येऊ शकतात. त्यांना आमदार होणार असे वाटते. मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात आहेत, असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी सभागृहात येऊन बसले. सुरक्षारक्षकांनी आत कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण होत आहे आदित्य ठाकरेंनी नंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर ते उठून बाहेर गेले.

Maharashtra Assembly Budget Session : असल्या व्हिपला भीक घालत नाही; भास्कर जाधव आक्रमकMaharashtra Assembly Budget Session : असल्या व्हिपला भीक घालत नाही; भास्कर जाधव आक्रमक
राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. तसेच निर्णयाचे कौतुक देखील केले आहे. कोरोनानंतर युवकांना रोजगार देण हा सरकारचा हेतु असल्याचे सांगत ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे राज्यपाल बैस यांनी अभिभाषणा रम्यान सांगितले.                                                                   राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ परिसरात दाखल आम्हाला अजूनही व्हीप प्राप्त झालेला नाही, असं सुनीर प्रभू यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टासमोर आम्ही व्हीप बजावणार नाही, असं ते बोले होते. पण जर त्यांनी व्हीप बजावला तर आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला. अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल यांचं अभिभाषण होऊ द्या मग पुढे बघू काय ते…याशिवाय विधानभवन इतकं मोठं आहे, इथे आम्हाला फिरण्यापासून कोणी थांबवू शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. या 55 आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.आजपासून होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला, सोयाबीनला भाव मिळत नाही. जिल्ह्यात वाळुमाफियांची मुजोरी वाढलीय, पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही काही उपयोग होत नाही. याउलट हप्ते वाढवून घेत सर्रासपणे हे धंदे सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारवर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. कर्ज घेताना मागील सात महिन्यातच मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. कर्ज घेऊन मोठ-मोठ्या शहरांकडे राज्य सरकारचं अधिक लक्ष आहे, ग्रामीण भागाकडे त्यांचं दुर्लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

राज्यात आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याने या न्यायालयीन संघर्षाच्या सावटाखाली कालपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Assembly Budget Session 2023-24) सुरू झाले आहे. आज दुसरा दिवस आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या