Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Budget पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी

Maharashtra Budget पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी

मुंबई :

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी दिली गेली. पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार असून त्यासाठी 16139 कोटी मंजूर केले आहे.

- Advertisement -
राज्याच्या सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटी रुपये देण्यात येणार. त्याबरोबर जलसंपदा विभागाच्या २७८ कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. राज्यात २७८ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे. दुसरीकडे प्रधानमंत्री सिंचन योजनेतंर्गत २६ प्रकल्पांना २१६९८ कोटी रुपये देणार. महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी मंजूर करण्यात आले आहे. डिसेंबर २३ अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून, १२ धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज

तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजनेची घोषणाही अजित पवार यांनी केली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १,५०० कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काय आहे अर्थसंकल्पात

-पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी

एसटी बसेस आधुनिकीकरणासाठी 1400 कोटी

चिपी विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात

घरकुल योजनांसाठी 2924 कोटी – अजित पवार

रमाई घरकुल योजनेसाठी 6 हजार 829 कोटी

जिल्हा परिषद शाळांसाठी 3 हजार कोटी

स्वच्छता आणि पाणीपुरवठ्यासाठी 2533 कोटी

– महावितरणला थकीत बिलात ३३ टक्के सूट

कृषी संशोधनासाठी चार कृषी विद्यापीठांसाठी 200 कोटींची तरतूद

उच्च-तंत्रशिक्षण विभागासाठी 1391 कोटींचा निधी

आयटीआयसाठी शिकाऊ उमेदवारांना 5 हजार रुपये

जलजीवन मिशनसाठी 84 लाख 78 हजार नळजोडण्या

एसटी महामंडळाला १ हजार ४०० कोटींचा निधी

राज्याच्या ग्रामीण भागात १० हजार किमी रस्त्यांची कामे आगामी काळात करण्यात येतील. त्याचबरोबर पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला राज्य सरकारची मंजुरी देण्यात आली आहे. पुणे-नाशिक मार्गावर २४ प्रकल्प उभारणार. परिवहन मंडळाला १ हजार ४०० कोटी निधी देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या