Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात नाशिकला काय? जाणून घ्या

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भाजपा आणि शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. अमृतकाळातील हा पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारीत असल्याच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या असून यात नाशिकला काही घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…

१) नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारणार.

२) नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी देणार.

३) जलयुक्त शिवार योजना 2 पुन्हा सुरू करणार. नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार असून यामुळे मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ होणार आहे.

४) भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

५) छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राज्याच्या अर्थसंकल्पात ‘या’ घटकांसाठी खुशखबर

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ६ हजार रूपयांमध्ये आणखी ६ रूपयांची वाढ राज्य सरकारकडून केली जाणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांकडून वर्षाकाठी १२ हजार रूपये मिळतील.

Maharashtra Budget 2023 Live Updates : वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प; अजित पवारांची टीका

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *