Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पातून नाशिकला काय मिळालं?

Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पातून नाशिकला काय मिळालं?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Govt) तिसऱ्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातून नाशिक जिल्ह्यासाठी विविध निधीची तरतूद करण्यात आली आहे....

नाशिक-पुणे मध्यम-अतिजलद रेल्वे प्रकल्पाचा ८० टक्के खर्च राज्य सरकार उचलणार आहे. नाशिकमध्ये फ़िजिओथेरिपी केंद्र उभारण्यात येणार असून नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

तसेच नवउद्योजकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकमधील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टरची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यात महिलांसाठी रुग्णालय उभारली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com