Thursday, April 25, 2024
HomeनगरMaharashtra Budget 2022 : शिर्डी विमानतळासाठी मोठी घोषणा

Maharashtra Budget 2022 : शिर्डी विमानतळासाठी मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. गुरूवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

- Advertisement -

या अर्थसंकल्पात शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी राज्यातल्या विमान वाहतुकीसाठीही (Transport budget 2022) काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे. यात शिर्डी विमानतळासाठी 150 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. शिर्डी विमानतळावरून मालवाहतुकीसाठी तसेच रात्रीच्या वाहतुकीच्या कामासाठ हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या