छत्रपती संभाजीनगमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली असून, शहरातील सातारा पोलीस स्टेशन परिसरातील वळदगाव येथे एकाच कुटूंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे यात एका पाच वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
पावसाळ्यापूर्वीच आता मुंबईत नालेसफाईचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे. नाल्यांमधून किती गाळ काढला यापेक्षा कुठेही पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच मुंबईत पाणी साचलं तर अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
तुमचे खाते एसबीआय बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अनेक संशयास्पद हालचालींमुळे तुमचे एसबीआय़ खाते तात्पुरते बंद केले जात आहे, अशा आशयाचा मेसेज अनेक एसबीआयच्या ग्राहकांच्या मोबाईलवर येत आहे. हा मेसेज स्कॅमर्सकडून पाठवला जात आहे.
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात रोज वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट (Arbaz Merchant) यांची नावे शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकण्यात आली असा दावा आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह (Dyaneshwar Singh) यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांना भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी जपानमध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेला (G-7 Summit) उपस्थित राहणार असून त्यांचा जपान दौरा 19 ते 21 मे दरम्यान असेल. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांची भेट घेणार आहेत. जपानच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत, पंतप्रधान सहभागी देशांसोबत G-7 सत्रांमध्ये बोलतील.
नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणे म्हणाले की, ठाकरे गटातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. जसा पक्षप्रमुख तसे नेते. एक रुपयांचे उत्पन्न नसताना ठाकरेंचे जीवन आलिशान. ठाकरे, राऊत हे खंडण्यांवर जगणारे लोक आहेत. असे नितेश राणे म्हणाले.
तसेच ते म्हणाले की, 2 रुपयांचे उत्पन्न नाही खर्च करतात कुठून? पेंग्विन ठाकरेची गाडीही स्वत:ची नाही आहे. ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायला तयार आहे. राऊतांना आता फक्त हज यात्रेला पाठवणं बाकी आहे. राऊतांचे धर्मांतर झाले आहे. असे नितेश राणे म्हणाले.
आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. यामुळे राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व १८ जागा ते लढवणार असून इतर काही जागांवरही दावा करणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले. महाविकास आघाडीत निवडणुकीचा कोणताही फार्मूला अजून ठरलेला नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी आहे आणि राहील. लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. तसेच २०१९ मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल अन् पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व १९ जण निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
अमृता फडणवीस खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने याप्रकरणी ७३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात अनिल जयसिंघानी, त्यांची मुलगी अनिक्षा आणि चुलत भाऊ निर्मल यांचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. आरोपपत्रात १३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.