Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या तसेच राजकीय, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करा...

बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जातात. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतरही अमिताभ यांचा उत्साह हा नवोदित कलाकारांना लाजवणारा आहे. बिग बी हे सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. आता त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
...अन् 'बिग बी' अमिताभ बच्चन चाहत्याकडून लिफ्ट घेत शुटींगला पोहोचले

ठाणे येथील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी येथील अमर टॉवर या इमारती मधील पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून पाच व्यक्ती अडकल्या. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोन जण सुखरूप आहेत.सुरक्षेचं दृष्टीने संपूर्ण इमारती रिकामी करण्यात आली आहे. ही इमारत 25 वर्ष जुनी आहे.

मुंबईकरांना आज एक दुर्मिळ आश्चर्य वाटले आहे कारण शहरातील रहिवासी आज झिरो शॅडो डे म्हणून ओळखल्या जाणार्‍या दुर्मिळ खगोलीय घटनेचे साक्षीदार झाले आहेत. आजच्या दिवशी तुम्ही सूर्याखाली उभे राहिल्यानंतर सुद्धा सावली दिसत नाही. केवळ मानवच नाही तर सूर्यप्रकाशातील कोणत्याही गोष्टीची अजिबात सावली दिसत ​​नाही.

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
मुंबईत सावलीच गायब; नागरिकांनी अनुभवला Zero Shadow Day

महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोणालाही दंगली घडवू देणार नाही. दंगेखोरांना अद्दल घडवू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अकोला आणि शेगाव या दोन्ही ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. सगळीकडे चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा दावा

मुंबईतील खारदांडा (Khardanda) येथे आज अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. खारदांडा येथील एका बेकरीत (Bakery Fire) गॅस गळती झाल्यामुळे आग भडकल्याने या आगीत सहाजण होरपळल्याची माहिती मिळाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
गॅस गळतीमुळे बेकरीला भीषण आग; सहा जण होरपळले

गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राऊत यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये,असे वक्तव्य केले होते...

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
नाशिक पोलिसांवर माझ्या विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव - संजय राऊत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवत कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात या विजयाचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. तर यावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या गळ्यात पडते की प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या गळ्यात पडते याची त्यांच्या समर्थकांसह सर्वच वाट पाहात आहे.

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
Karnataka CM : कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज होणार फैसला

पंजाब येथील संगरूर येथील कोर्टाने १०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना समन्स बजावले आहे. हिंदू सुरक्षा परिषदेचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी खरगेंच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. कर्नाटक निवडणुकांदरम्यान बजरंग दलाच्या विरोधात अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. कोर्टाने खरगे यांना १० जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

छत्तीसगढ भाटापारा येथील खमरिया गावाजवळ मालवाहू ट्रक आणि पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना भाटापारा आणि बलौदा बाजार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्री उशिराची असल्याचे सांगण्यात येत आहे.

खडकवासला येथील गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) गावच्या हद्दीत धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. पण दोन मुली बुडाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
पोहण्याचा मोह जीवावर बेतला, खडकवासला धरणात नऊ मुली बुडाल्या...

शेवगाव येथे संभाजी महाराज मिरवणुकीत दगडफेक, ४ पोलीस जखमी

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
शेवगाव येथे संभाजी महाराज मिरवणुकीत दगडफेक, ४ पोलीस जखमी

सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ

Live Updates : जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण जखमी
सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ

संभाजीनगर शहरातील कटकट गेट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अडकून १४ वर्षीय चिमुकल्याचं दुर्देवी मृत्यू झाला आहे. आई-वडील हैदराबादला गेलेले असताना मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्यामुळं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साकिब इरफान सिद्दीकी असं लिफ्टमध्ये अडकून मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना पुन्हा ईडीने समन्स पाठवले आहे. २२ मे रोजी सोमवारी चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com