Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रSSC Result दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरू होणार कधी?

SSC Result दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरू होणार कधी?

मुंबई

दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result)झाला आहे. कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १०वीच्या परीक्षा (Maharashtra 10th result) होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

SSC result दहावीत सर्वच विद्यार्थी पास, असा पाहा तुमचा निकाल

दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार होता. परंतु दहावीचा निकाल जाहीर होऊन अर्धा तास झाला तरी विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नाही. कारण दुपारी १ वाजताच बोर्डाची वेबसाईट हँग झाली. तसेच एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नाही.

तब्बल चार तासांपासून वेबसाईट हँगच

अचानक वेबसाईट्सचे यूजर वाढल्यानं ही साईट हँग झाल्याची माहिती आहे. मात्र आता ही समस्या सोडवण्यासाठी चार तास झाले तरी वेबसाईट सुरु झाली नाही. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं की, “ही तांत्रिक बिघाड अचानक समोर आला आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. काही वेळात वेबसाईट सुरू होईल.”

दहावीची यंदाची एकूण विद्यार्थी संख्या 16 लाख 58 हजार 624 इतकी आहे. लाखो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट उघडल्याने वेबसाईट क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दहावीचा निकाल जाहीर; कशी असेल अकरावी प्रवेशाची प्रक्रिया? जाणून घ्या

असा पाहा निकाल

https://mahresult.nic.in/

https://mahahsscboard.in/

https://results.gov.in/

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.

आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.

लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या