Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रअखेरी दहावीची परीक्षा रद्दचे परिपत्रक निघाले, अकारावी प्रवेशाबाबत म्हटले...

अखेरी दहावीची परीक्षा रद्दचे परिपत्रक निघाले, अकारावी प्रवेशाबाबत म्हटले…

मुंबई

राज्यात करोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परीक्षा रद्द (Maharashtra SSC exam cancelled) करण्याचा निर्णय २० एप्रिल रोजी घेण्यात आला होता. त्याचा शासन निर्णय आज (ता.१२ मे) रोजी निघाला. त्यात दहावीची परीक्षा रद्द केल्याने गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल उल्लेख केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच १० वीची परीक्षा आयोजित करण्यात येते. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी मे महिन्यात ही परीक्षा होणार होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्यानंतर माहाराष्ट्र बोर्डाने परीक्षा रद्द केली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातला एक व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता.

आता याबाबतचा शासन निर्णय आज झाला आहे. त्यात म्हटले आहे की, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा रद्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विनियम १९७७ मध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत मंडळाने यथोचित कार्यवाही करावी.

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच ११ वी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या