Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रHSC Result : बारावीचा निकाल या तारखेला लागणार कारण...

HSC Result : बारावीचा निकाल या तारखेला लागणार कारण…

मुंबई :

राज्यातील 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बारावीचा निकाल ( HSC Result) येत्या 30 जुलैला लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने(supreme court) 12 वी चा निकाल हा 31 जुलैपर्यंत लावण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

कसारा घाटातील तो व्हिडिओ खोटा, काय आहे सत्य?

न्यायालयाच्या या आदेशानुसार शिक्षण मंडळाने निकाल लावण्यासाठी कंबर कसली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court)आदेशाचा भंग होऊ नये म्हणून बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. विद्यार्थ्यांनाही पुढील शिक्षणासाठी 12 वीचा निकाल महत्वाचा आहे. त्यामुळे आता विद्यार्थी मंडळीचं लक्ष हे निकालाकडे लागली आहे.

फॉर्म्युला काय?

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

असा लागणार निकाल

इयत्ता 10 वीच्या गुणांना 30 टक्के भारांश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी 30 टक्के भारांश

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी 40 टक्के भारांश

बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या