Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रबारावीचा निकाल ९९.६३ टक्के, असा पहा तुमचा निकाल

बारावीचा निकाल ९९.६३ टक्के, असा पहा तुमचा निकाल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (maharashtra board) बारावीचा निकाल (hsc result) आज जाहीर होणार आहे. आज दुपारी चार वाजता ऑनलाईन (online result) पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापुर्वी मंडळाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 12 वीचा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे.

- Advertisement -

बारावीत राज्यातील ४६ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहे. शाखानिहाय निकालात सर्वाधिका निकाल वाणिज्य शाखेचा 99 .91टक्के लागला आहे. विज्ञान 99.55 कला 99.83 टक्के निकाल लागला आहे. एमसीव्हीसीचा निकाल 98.8 टक्के लागला आहे.

यंदा दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना वेळेत निकाल पाहता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी एकापेक्षा अधिक लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?

1) http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा

2) यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा

3)त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करावा

4) यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल

या ठिकाणी पाहा निकाल (List of Websites for Result)

१. hscresult.11thadmission.org.in/

२. msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

४. mahresult.nic.in

बारावीचा निकाल कसा पाहाल ?

*निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

*त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

*त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

*त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

*यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

*निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

निकालाचे हे आहे सूत्र

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालंत परीक्षेचा निकाल ३० :३०: ४० या पद्धतीने लावण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित ३० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर दुसरीकडे अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण याचा ३०टक्के विचार केला जाईल इयत्ता बारावी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन आतील प्रथम सत्र परिक्षा सराव परीक्षा सराव चाचण्या तसेच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण ४० टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.

दहावी मार्क्स यावर ३० टक्के

११ इयत्ता मार्क्स यावर सरासरी ३० टक्के

१२ इयत्ता यासाठी अंतर्गत परिक्षा यावर ४० टक्के गुण असतील

इयत्ता १२वी च्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण लक्षात घेतले जातील.

2020 साली बारावीचा विभागनुसार निकाल कसा होता?

मुंबई- 89.35 टक्के

पुणे- 92.50 टक्के

नाशिक 88.87 टक्के

नागपूर – 92.65 टक्के

कोकण – 95.89 टक्के

कोल्हापूर – 92.42 टक्के

अमरावती – 92.09 टक्के

लातूर -89.79 टक्के

औरंगाबाद – 88.18 टक्के

- Advertisment -

ताज्या बातम्या