बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलीच अव्वल, नाशिकचा निकाल किती?

निकाल
निकाल

पुणे | Pune

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (12th Exam Result) आज जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते...

निकाल
Nashik : शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

राज्य शिक्षण मंडळाने (State Board of Education) जाहीर केलेल्या निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. तर कोकण विभागाचा (Konkan Division) निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला आहे. तसेच मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांने वाढले असून यंदाही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना (Students) दुपारी दोन वाजेपासून राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.

निकाल
Hingoli Accident News : ट्रकचा भीषण अपघात; १५० मेंढ्यांसह ५ जणांचा मृत्यू

दरम्यान, यंदा सर्व विभागीय मंडळातून ९३.७३ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्व शाखांमधून ३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तसेच खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

पुणे : ९३.३४ टक्के

नागपूर : ९०.३५ टक्के

औरंगाबाद : ९१.८५ टक्के

मुंबई : ८८.१३ टक्के

कोल्हापूर : ९३.२८ टक्के

अमरावती : ९२.७५ टक्के

नाशिक : ९१.६६ टक्के

लातूर : ९०.३७ टक्के

कोकण : ९६.०१ टक्के

शाखानिहाय निकालाची टक्केवारी

शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी

विज्ञान : ९६.०९ टक्के

कला : ८४.०५ टक्के

वाणिज्य : ९०.४२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम : ८९.२५ टक्के

विद्यार्थ्यांना 'या' संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

http://mahresult.nic.in

https://hsc.mahresults.org.in

http://hscresult.mkcl.org

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com