Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याविद्यार्थ्यांनो! उद्या बारावीचा निकाल; किती वाजता अन् कुठे पाहाल? जाणून घ्या सविस्तर

विद्यार्थ्यांनो! उद्या बारावीचा निकाल; किती वाजता अन् कुठे पाहाल? जाणून घ्या सविस्तर

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अशातच आता बारावीच्या निकालाबाबत मोठी माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

सुरगाणा बाजार समिती सभापतीपदी पवार, उपसभापतीपदी चौधरी यांची निवड

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यामुळे आजपासूनच विद्यार्थ्यांना निकालाबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

IPL 2023 : आज ‘एलिमिनेटर’ची लढत; मुंबईसमोर लखनऊचे आव्हान

दरम्यान, उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

विद्यार्थ्यांना ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

http://mahresult.nic.in

https://hsc.mahresults.org.in

http://hscresult.mkcl.org

- Advertisment -

ताज्या बातम्या