Maharashtra bandh : आज का आहे महाराष्ट्र बंद? काय सुरू राहील, काय बंद?

Maharashtra bandh : आज का आहे महाराष्ट्र बंद? काय सुरू राहील, काय बंद?
बंद

मुंबई l Mumbai

महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. आज ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं (Maharashtra Bandh) आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या चिरडण्यात आलं होतं. घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद आहे. लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले. या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

याविरोधात देशभरात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. केंद्र सरकारला या बंदमधून सरकारला इशारा देण्यासाठी जनेतेने स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे.

काय सुरू, काय बंद?

'महाराष्ट्र बंद' दरम्यान हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, रुग्णवाहिका, दूध पुरवठा इत्यादी गोष्टींसह अत्यावश्यक आणि जीवनावश्यक गोष्टी सुरूच राहीतल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com