मालेगाव पाठोपाठ अमरावती, नांदेडमध्ये बंदला हिंसक वळण

मालेगाव पाठोपाठ अमरावती, नांदेडमध्ये बंदला हिंसक वळण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्रिपुरा येथे मुस्लीम समाजातील नागरिकांवर हल्ला झाला. धर्मगुरू हजरत मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल काही कट्टरपंथी यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आज रजा अकादमी तसेच इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती....

या बंदला आता राज्यात हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. मालेगावी (Malegaon) मुस्लीम बहुल भागातील नागरिक बस स्तनद परिसरात आले. त्यांच्याकडून दुकाने बंद करण्याबाबत सांगण्यात आले. परंतु एका गटाने उघड्या दुकानांवरच दगडफेक केल्याने मालेगावी मोठा राडा झाला.

दरम्यान, त्रिपुरा (Tripura) येथील मशीद जाळल्याची अफवा राज्यभरात पसरत आहे. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असल्याचे दिसून येत आहे. मालेगाव पाठोपाठ अमरावती (Amravati), नांदेडमध्ये (Nanded) दंगली झाल्या.

अमरावतीत सुमारे २० ते २५ दुकानांवर मोर्चेकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली. तर नांदेडमध्येदेखील दुकाने व वाहनांवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका, तसेच शांतता बाळगा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com