महाराष्ट्र बंद : नाशकातील परिस्थिती कशी? 'पाहा' इथे

महाराष्ट्र बंद : नाशकातील परिस्थिती कशी? 'पाहा' इथे

नाशिक | प्रतिनिधी | nashik

उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ (maharashtra bandh) पुकारला आहे. महाविकास आघाडीने बंदची हाक दिली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला. समितीत पूर्णतः शुकशुकाट असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.

तर नाशिकरोड (Nashikroad) परिसरात काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सध्या बिटको चौक येथे एकत्र झाले आहे. दरम्यान बंदला परिसरातील जेलरोड, देवळाली गाव, सिन्नर फाटा, सुभाष रोड, मुक्तीधाम परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काही दुकाने सुरू आहे तर काही ठिकाणी बंद आहे.

मेनरोड (Mainroad) परिसरातदेखील महाराष्ट्र बंदला चांगला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परिसरातील बहुतांश दुकाने बंद आहेत. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन करत आहेत.

Related Stories

No stories found.