महाराष्ट्र बंदला मालेगावी हिंसक वळण; दगडफेक करणार्‍यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

महाराष्ट्र बंदला मालेगावी हिंसक वळण; दगडफेक करणार्‍यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मालेगाव । Malegaon

त्रिपुरा (Tripura) येथे मुस्लीम समाजातील (Muslim Community) नागरिकांवर हल्ला झाला. धर्मगुरू हजरत मोहंमद पैगंबर (hazrat muhammad paigambar) यांच्याबद्दल काही कट्टरपंथी यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आज रजा अकादमी तसेच इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती....

याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी सुन्नी जमेतुल उलमा व रजा अ‍ॅकेडमीसह (Raja Academy) मुस्लीम संघटनांनी पुकारलेल्या बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले.

काही तरूणांनी मोर्चे काढत व्यापारी संकुलातील उघडी दुकाने दगडफेक करीत बंद करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी घटनास्थळी पाचारण झालेल्या शीघ्र कृती दलाच्या (Rapid action force) जवानांसह वाहनांवर देखील दगडफेक संतप्त जमावातर्फे सुरू करण्यात आल्याने पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लाठीमार करत जमावास पिटाळून लावले.

या घटनेने शहरात तणावाचे वातावरण पसरून भितीने दुकाने पटापट बंद करण्यात आली. बंद दुपारपर्यंत शांततेत पार पडत असतांना अचानक काही भागातून तरूणांचे मोर्चे किदवाईरोडवरील शहीद टॉवरजवळ येवून धडकले.

यावेळी घोषणा देत तरूणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी लोखंडी जाळ्या लावून पोलिसांनी नाकेबंदी केली असता या तरूणांनी जुना आग्रारोडवर जावून व्यापारी संकुलाकडे कुच करत दगडफेक सुरू केल्याने व्यापार्‍यांमध्ये एकच घबराट पसरून दुकाने पटापट बंद झाली.

या प्रकाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी (Additional SP Chandrakant Khandavi), उपअधिक्षक लता दोंदे (DCP Lata Donde), शहर पो.नि. धुसर (PI Dhusar) आदी अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत दगडफेक करणार्‍या जमावास लाठीमार करत पिटाळून लावले. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com