शेतकऱ्यांसाठी 'महा'एल्गार; महाराष्ट्र बंदच्या महत्त्वाच्या अपडेट फक्त एका क्लिकवर...

शेतकऱ्यांसाठी 'महा'एल्गार; महाराष्ट्र बंदच्या महत्त्वाच्या अपडेट फक्त एका क्लिकवर...

मुंबई l Mumbai

उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. महाविकास आघाडीने बंदची हाक दिली असून त्यामध्ये महाआघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, त्यांचे घटक पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत.

महाविकास आघाडी प्रायोजिक आजच्या बंदमध्ये मविआ सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघड - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. भाजपला त्यांचं राजकीय मत आग्रहाने मांडायचं आहे हे समजू शकतो, पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे

जयंत पाटील

भाजप मंत्र्याचा मुलगा आरोपी असल्याने 'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध - छगन भुजबळ

महाराष्ट्र (Maharashtra Bandh) बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्री दगडफेक करून आठ बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पोलीस संरक्षणाने मुंबईत बस चालवण्याची योजना हाती घेण्यात आली.

महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाठिंबा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदला प्रतिसाद

देशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखीमपुरातल्या घटनेने देशातील शेतकरी वर्ग भयभीत आहे. आजचा महाराष्ट्र बंद लोकशाही वाचविण्यासाठी आहे. - बाळाासहेब थोरात

महाराष्ट्र बंदला यशस्वी करण्यासाठी बीड शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं सकाळीच रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना गुलाबाचं फुल देऊन आपली आपली दुकान बंद करण्याच आवाहन करीत आहेत.

बेस्ट च्या ८ बस ची रात्री १२ नंतर तोडफोड झाल्याची माहिती समोर येत आहे. काही तुरळक बस फेऱ्या सुरू आहेत. पोलीस संरक्षण मिळाल्यास इतर फेऱ्या देखील सुरू केल्या जाणार असल्याच प्रशासनाच म्हणणं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद, ग्रामीण भागातील दुकानं व्यापाऱ्यांनी ठेवली कडकडीत बंद.

मुंबईत राजभवनाजवळ काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन

नागपूर येथील व्यापाऱ्यांचा विरोध : महाराष्ट्र बंदला नागपूर येथील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आम्हाला उद्याचा बंद पाळता येणार नाही, असं जाहीर केले आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांचा बंदला पाठिंबा : महाराष्ट्र बंदला मुंबई डबेवाला असोसिएशन जाहीर पाठिंबा देत आहे,' अशी भूमिका डबेवाल्यांच्या संघटनेकडून मांडण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.