उद्यापासून अधिवेशन : लसीचे दोन्ही डोस बंधनकारकसह ही असणार नियमावली

उद्यापासून अधिवेशन : लसीचे दोन्ही डोस बंधनकारकसह ही असणार नियमावली

मुंबई :

महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन(maharashtra assembly session) २२ डिसेंबर पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत असून अधिवेशन संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांसंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (ramraje naik nimbalkar), महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ(narhari zirwal) आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (neelam gorhe)यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.

उद्यापासून अधिवेशन : लसीचे दोन्ही डोस बंधनकारकसह ही असणार नियमावली
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, फडणवीसांचा राज्य सरकारवर घणाघात

लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सभापती नाईक-निंबाळकर यांनी दिल्या. सोमवार, दिनांक २० डिसेंबर रोजी एकूण २६७८ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली, त्यापैकी ८ जणांची चाचणी सकारात्मक आली आहे. लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी बंधनकारक आहे.

अभ्यागतांना प्रवेश नाहीच

अधिवेशन कालावधीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नसून स्वीय सहायकांसाठी बसण्याची व्यवस्था विधान भवनासमोरील वाहनतळ आवारात स्वतंत्र मंडप टाकून करण्यात आली आहे. मंत्री यांच्या आस्थानपनेवरील कर्मचारी यांना देखील अत्यंत मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येत आहे.

उद्यापासून अधिवेशन : लसीचे दोन्ही डोस बंधनकारकसह ही असणार नियमावली
S-400 missile भारताचे सुरक्षाकवच चीन-पाकचे क्षेपणास्त्र करणार निष्पभ्र

एक आसन सोडून व्यवस्था

विधानसभा सभागृहामध्ये सुयोग्य अंतर राखण्याच्या दृष्टीने अधिवेशन कालावधीमध्ये सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था एक आसन सोडून करण्यात आली असून गतवर्षीप्रमाणेच सभागृहाच्या गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानपरिषद सभागृहामध्ये आसन व्यवस्था पुरेशी असल्यामुळे सन्माननीय सदस्यांची बसण्याची व्यवस्था सभागृहामध्येच करण्यात आली आहे. विधानसभा, विधानपरिषद व मध्यवर्ती सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com