सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देणार

राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनला सुरुवात
सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देणार

मुंबई

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवादाबाबत सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना, मदत यांचाही उल्लेख केला.

राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. “धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केलं. राज्य सरकारनं करोनासंदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. करोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत,” अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

“माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. करोनाविरोधातील लढाई सुरु असून राज्य सरकारनं मी जबाबदार ही योजना सुरु केली,” असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. “करोनासंदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेण्याची गरज,” असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारकडून राज्याला उपलब्ध झालेल्या तसंच शिल्लक असलेल्या वस्तू वसेवा कराच्या परताव्याची माहिती देण्यात आली. राज्य सरकारने २६ जानेवारी २०२० ला शिवभोजन योजना सुरु केली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com