गोंधळाच्या वातावरणात पावसाळी अधिवेशन सुरु

मास्क आणि फेस शिल्ड सह आमदार सभागृहात..
गोंधळाच्या वातावरणात पावसाळी अधिवेशन सुरु

मुंबई

दोन दिवसांचे सर्वात कमी कालावधीचे पावसाळी अधिवेशन गोंधळाच्या वातावरणात सुरु झाले.

मास्क, संपूर्ण चेहऱ्यावर कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये म्हणून लावलेली फेस शील्ड, हात मोजे म्हणजे हँडग्लोव्हस आणि पावसाळी वातावरण असल्याने सांभाळावी लागणारी छत्री, मंत्री असो, आमदार असो, विधानभवन कर्मचारी असो अथवा पत्रकार !सगळ्यांची धांदल उडाली होती, वातावरणात अदृश्य पण जाणवत असलेला ताण!.. आपली कोरोनाची चाचणी नेगेटिव्ह आली म्हणून सोडलेला निश्वास आणि पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची संधी वाया गेली म्हणून नाराज विरोधी पक्ष नेते आणि आमदार या वातावरणात 2दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

सभागृहात ही सोशल डिस्टंसिन्गचे पालन करत एका आसनावर एक सदस्य बसवण्यात आला होता, त्या मुळे अभ्यागत कक्ष आणि विद्यार्थी कक्षात ही आमदारांची बसायची सोय केली होती.. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्ष स्थानी होते... कोरोना विषाणु संसर्गाच्या पाश्वभुमी हे अधिवेशन केवळ 2दिवसाचे घेण्यात येत आहे, आत्ता पर्यंत चे हे सगळ्यात छोट्या कालावधी चे अधिवेशन आहे...

प्रवेशद्वाराजवळ काही आमदार विधानभवन कर्मचा-यांशी हुज्जत घालत होते.. आमदारांचे कोरोना चाचणी अहवाल अजुन अपलोड झाले नव्हते, अजित दादा पवार यांनी प्रवेश द्वारावर येऊन संगणक हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, वातावरण थोडे तणावाचे झाले, मात्र त्या नंतर ही चाचणी अहवाल पहिल्या वरच आमदारांना प्रवेश देण्यात आला..

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com