
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा आज (23 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. मुंबईत होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या (assembly session)पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आले नाहीत. त्याची खूप चर्चा झाली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांच्या प्रकृतीवरून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad)यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil )यांचा बाप काढला होता. आव्हाडांच्या या विधानावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. बाप काढणं ही आव्हाडांची संस्कृती आहे. माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्या बापाने निवडणूक लढवली नव्हती. ते मिलमध्ये काम करत होते. त्यांचा अपघात झाल्यानंतर 11 महिन्यानंतर ते मिलमध्ये रुजू झाले होते. आव्हाड माझा बाप काढतात ती आव्हाडांची संस्कृती आहे. माझी नाही.
महापौरांच्या टीकेला उत्तर देण्यास नकार दिला. मला महापौरांचा परिचय नाही. त्यांच्यावर बोलण्याची इच्छा नाही. त्यांचं स्टेटमेंट बालिश आहे. उद्धवजींनी आजारी असताना विधानसभेत येण्याचा हट्ट धरू नये असं माझं म्हणणं आहे. त्यांनी इतरांना जबाबदारी सोपवावी. देवेंद्रजी आजारी आहेत का? झोपलेले आहेत का? अरे चाललंय काय? असा सवालच त्यांनी केला.