Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याठरलं! 'या' तारखेपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात

ठरलं! ‘या’ तारखेपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात

मुंबई । Mumbai

गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाल्यानंतर आता राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session) मुहूर्त ठरला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद (Assembly and Legislative Council) कामकाज सल्लागार समितीच्या (Working Advisory Committee) आज झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली…

- Advertisement -

यंदाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत मुंबईत (Mumbai) होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे १८ जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते.

तसेच हे अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार असले तरी यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामळे अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचे असणार आहे.तर २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav of Freedom) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद आणि विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, या बैठकीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gore) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत (Rajendra Bhagwat) आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या