Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याअयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राचाही हातभार; चंद्रपुरातून 'ही' वस्तू अयोध्येला रवाना

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राचाही हातभार; चंद्रपुरातून ‘ही’ वस्तू अयोध्येला रवाना

चंद्रपूर | Chandrapur

अनेक वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या अयोध्येतील (Ram temple) राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राचाही हातभार लागणार आहे. रामायणात ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे त्या दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील सागवन काष्ठ अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी वापरले जाणार आहे. हे काष्ठ पाठविण्याचा आनंदोत्सव चंद्रपूर आणि बल्लारशामध्ये बुधवारी साजरा झाला…

- Advertisement -

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्रातून सागवानच्या लाकडांची पहिली खेप पाठवण्यात आली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात मोठ्या प्रमाणात सागवानचे लाकूड वापरले जाणार असून त्यासाठी विदर्भाच्या चंद्रपुरातील उत्तम दर्जाची लाकडं पाठण्यात आली आहे. राम मंदिरासाठी सागवान नेण्यात आल्यामुळं चंद्रपूर आणि बल्लारपूर या शहरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाची आत्महत्या

अयोध्येतील राम मंदिराचे (Ram temple) महाद्वार, मुख्य मंदिराची संरचना आणि गाभाऱ्याच्या दरवाजांसाठी सागवानाच्या लाकडांचा वापर केला जाणार आहे. भाजपा नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांनी काष्ठपूजन केल्यानंतर सागवान लाकडांची पहिली खेप अयोध्येसाठी रवाना करण्यात आली.

Breaking News गुराख्यासह दहा जनावराचा रेल्वेखाली मृत्यू

चंद्रपुरातील आलापल्लीच्या जंगलातील सागवानाची लाकूड राम मंदिराच्या उभारणीसाठी नेण्यात आले आहेत. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सर्वोत्तम सागवानच्या लाकडांसाठी डेहराडून येथील वन संशोधन संस्थेला संपर्क केला होता.

त्यावेळी संस्थेनं चंद्रपुरातील सागवान सर्वोत्तम असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानंतर आता चंद्रपुरातून राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड देण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

“श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजीच्या भूमीतून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवन काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे, तसेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे.” असे मत चंद्रपूरचे पालकमंत्री, तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाचा वापर करून उकळले पैसे, काय आहे प्रकरण ?

- Advertisment -

ताज्या बातम्या