शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेस जळगावात लागला ब्रेक..

आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या युवासेनेच्या शरद कोळी यांना 7 दिवस जिल्हाबंदी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेस जळगावात लागला ब्रेक..

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

धरणगाव (Dharangaon) येथील सभेत (meeting) आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) केल्यामुळे युवासेनेचे राज्य विस्तारक (Yuva Sena's state expander) शरद कोळी (Sharad Koli) यांना महाप्रबोधन यात्रेत (Mahaprabodhan Yatra) भाषण (speech)करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी (Banned by Collector) घातली. तसेच गुर्जर समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांनी कोळी यांना सात दिवसांसाठी जिल्हाबंदी करुन महाप्रबोधन यात्रेतील (Mahaprabodhan Yatra) पुढील दोन्ही सभा रद्द करण्याचे आदेश (Cancellation order) काढले. तसेच पोलिसांकडून त्यांच्यावर स्थानबद्धची कारवाई करण्यासाठी गेले असता, ठाकरे गट आक्रमक होवून रस्त्यावर उरतला होता.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. सोमवारी धरणगावला तर मंगळवारी पाचोरा आणि एरंडोल येथे सभा झाल्या. या सभेत शिवसेनेच्या उप नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. या नेत्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांसह पालकमंत्री ना. गुलाबरावपाटील यांच्यावर अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. दरम्यान गुरुवारी शरद कोळी यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी गुर्जर समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले.

त्याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली असून त्याबाबतचे नोटीस देखील काढले. ही नोटीस पोलिस प्रशासनाकडून गुरुवारी दुपारी शरद कोळी यांना देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी त्यांना स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्र्य पोटे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा त्यांना ताब्यात घेण्यासाठी हॉटेलमध्ये दाखल झाला.

ठाकरे गट विरुद्ध पोलीस

शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे, शरद कोळी, संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे चोपडा येथे सभेला जाण्यासाठी निघाले. कोळी राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस दाखल झाले असता शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाषण करण्यास बंदीचे आदेश असतांना पोलिसांनी कोळी यांना सभेच्या ठिकाणी जावू देण्यास देखील बंदी केल्याने आक्रमक ठाकरे गट आक्रमक झाला. त्यामुळे ठाकरे गट विरुद्ध पोलिस असे चित्र पहायला मिळाले.

घोषणाबाजी करीत पोलिस ठाण्यात मोर्चा

शरद कोळी यांना सभेला जाण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जात असल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे, संजय सावंत, विष्णू भंगाळे, शरद तायडे यांच्यासह पदाधिकारी पायी मोर्चा काढून ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सभास्थळी येवू देण्यासाठी धरला आग्रह

ठाकरे गटाचे नेतेमंडळींसह पदाधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी ठाकरे गटाचे नेते त्यांनी शरद कोळी भाषण करणार नाहीत. पण, त्यांना सभेस्थळी येवू द्यावे असा आग्रह धरला. त्यांचे म्हणणे ऐकून घेत चिंथा यांनी त्यांना घेवून जाण्यास होकार दिला. त्यानुसार ठाकरे सेनेचे पदाधिकारी चोपड्याकडे रवाना झाले.

चोपड्याकडे पथके रवाना

धरणगाव पोलीस ठाण्यात युवासेनेचे शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. तसेच वरिष्ठांकडून कोळी यांना स्थानबद्ध करण्याचे आदेश असल्याचे समजताच चिंथा यांनी शरद कोळींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केली.

कारवाई होण्यापुर्वीच वाहनातून रवाना

मोर्चासोबत शरद कोळी हे शहर पोलीस ठाण्यापर्यंत आले. परंतु स्थानबद्धची कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच कोळी हे एका वाहनातून चोपड्याकडे रवाना झाले. हे समजताच पोलिसांनी देखील त्यांच्या मागावर निघाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com