Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहापेडीकॉन 2022 : बाल्यावस्थेतील शिक्षण महत्वाचे

महापेडीकॉन 2022 : बाल्यावस्थेतील शिक्षण महत्वाचे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बाल्यावस्थापूर्व संगोपन शिक्षण, बालविकास व सुश्रुषा, बालसंगोपन आणि बाल्यावस्थेतील शिक्षण हे मुलांच्या पूर्ण क्षमतेने वाढ होण्यासाठी मूलभूत घटक आहेत. परंतु सध्या विकसित देशांमध्येही चांगल्या प्रतीच्या पालनपोषण व शैक्षणिक सुविधा सर्व मुलांना समान उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपल्याकडे ही समान पातळी गाठण्याचे आव्हान असल्याचा सूर येथे एका कार्यशाळेत व्यक्त झाला.

- Advertisement -

इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स शाखा नाशिक (Indian Academy of Paediatrics, Nashik )आणि महाराष्ट्र स्टेट ब्राँच ऑफ इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बालरोग तज्ज्ञांच्या परिषद ‘महापॅडिकॉन 2022’ अंतर्गत युनिसेफच्या सहकार्याने कार्यशाळा घेण्यात आल्या. बालकांच्या प्राथमिक स्तरावरील विकासात बालरोग तज्ज्ञांचे महत्व व भूमिका, बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी महत्वपूर्ण बाबी, जन्मानंतर 1000 दिवसांपर्यंत बाळाच्या संगोपणाची आदर्श पद्धती यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांनी कार्यशाळेतून मार्गदर्शन केले.

एकूण 8 कार्यशाळेचे आयोजन केले. त्यातील 6 आडगाव येथील मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे आणि उर्वरित 2 अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे पार पडल्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मृदुला फडके यांचे मार्गदर्शन लाभले. आडगाव येथील डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांचे कार्यशाळांसाठी सहकार्य लाभले. तर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यशाळेत डॉ. हेमंत गंगोलिया, डॉ. अमोल पवार, डॉ. जय भांडारकर, डॉ. सुशिल पारख यांचे मार्गदर्शन लाभले.

युनिसेफच्या सहकार्याने झालेल्या परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.रमाकांत पाटील, आयोजन समिती सचिव डॉ. मिलिंद भराडिया, कार्यशाळा समितीचे अध्यक्ष डॉ.रविंद्र सोनवणे, डॉ.सागर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळांमध्ये डॉ. सिमिन इराणी, डॉ. सुबोध गुप्ता, डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. उदय बोधणकर, डॉ. प्रमिला मेनन, डॉ. उपेंद्र किंजवाडेकर, डॉ. शर्मिला कुलकर्णी, डॉ. चेतन शहा, डॉ.सुचेता किंजवाडेकर, डॉ.आनंद देशपांडे, डॉ.अनुराग पांगरीकर, डॉ.समीर दलवाई त्यांच्याशी निगडीत विषयांबाबत मार्गदर्शन केले. समितीचे मुख्य सचिव डॉ. मिलिंद भराडिया यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या