Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामहानुभाव संमेलनास प्रारंंभ: चक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान विश्वात पोहोचवा: बिडकर

महानुभाव संमेलनास प्रारंंभ: चक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान विश्वात पोहोचवा: बिडकर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

भगवान श्री चक्रधर स्वामी (Shri Chakradhar Swami) यांचे महानुभाव तत्त्वज्ञान विश्वातील सर्व भाषेत पोहोचले पाहिजे. संकुचितपणा सोडून आपल्या संंस्कृती वृध्दीसाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन डॉ. बिडकर बाबा महाराज (Dr. Bidkar Baba Maharaj) यांनी आज येथे केले.

- Advertisement -

भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन (Akhil Bhartiya Mahanubhav Sammelan), नाशिक (nashik) येथे आजपासून सुरु झाले. ते बुधवार (दि 31) पर्यंत तीन दिवस श्री चक्रधरनगर डोंगरे वस्तीगृह मैदान (Dongre Hostel Grounds) येथे चालणार आहे. आज पहिल्या दिवशी सकाळी चक्रधर स्वामींच्यां चरमाकीतस स्तनाक स्नान घालण्यात आले.

त्यानंतर ध्वजारोहण झाले. यावेळी बिडकर बाबा बोलत होते. यावेळी समारंभाचे मार्गदर्शक सुकेणेकर, चिरडे, कृष्णराज मराठे, लोणारकर, खामणीकर, विध्दांस, कारंजेकर, लासुरकर, आयोजक व स्वागताध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब सानप, दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, प्रकाश घुगे , प्रकाश ननावरे, प्रभाकर भोजने, अरुण महानुभव, विश्वास नागरे उपस्थित होते.

बिडकर पुढे म्हणाले की, श्री चक्रधर स्वामी यांचे विचार समाजातील सर्व स्तरांत पोहोचण्यासाठी महानुभाव पंथातील सर्व संत, महंत आजच्या काळात प्रयत्न करीत आहेत. सुमारे आठ वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या शिष्य आणि भक्तांना अनेक विषयांवर निरूपण केले. सकाळ, दुपार, सायंकाळ असे त्रिकाळ हे निरूपण चालायचे.

यावेळी नागदेव, बाईसा, महदाइसा, दादोस असा शिष्य परिवार सोबत असत. या निरूपणात सूत्रे, दृष्टांत, कथा, संवाद, नाट्य असे विविध रंग असत. यासाठी कौशल्य, नाट्यअभिनय, समर्थक दृष्टांत आणि प्रवाही निवेदन (memorandum) यांनी युक्त अशा निरुपणामधून जीवनदर्शन घडवले. त्यानंंतर ज्या पध्दतीने प्रचार प्रसार व्हायला हवा होता तो झाला नाही.

त्यामुळे पंथ सीमित झाला. आता मात्र जगभर हे तत्तज्ञान नेण्याचा प्रयत्न या निमित्ताने करुया. यावेळी पूजदेकर यांचे भाषण झाले. दिनकर पाटील यांनी स्वागत केले. प्रकाश घुगे यांनी आभार मानले. लक्ष्मण जायभावे, उदय सांगळे, संजय बोजणे, सागर जैन, अनील जादव, प्रदीप वैद्य, मुकुंद बावस्कर, देवेंद्र भुजबळ, भास्कर सानवणे, राजेंद्र जायभावे, सीताराम आंधळे, नंदू हांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी कवी संमेलन झाले. रात्री कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली.

आज प्रारंभ झाल्यानंतर तीन दिवसीय कार्यक्रमात भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गंगा गोदावरीच्या नदीपात्रातील ढगातळी आसन या स्थानावरील मंदिराचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या निमित्ताने धर्मसभा, संत महंतांची मिरवणूक व शोभायात्रा, भजन, कीर्तन, कथाकथन, प्राचीन, काव्यवाचन, कवी संमेलन व स्वामींच्या तत्त्वज्ञानावर चर्चाही रंगणार आहेत. या संमेलनास संपूर्ण देशभरातून संत, महंत, भिक्षुक, वासनिक, साहित्यिक, लेखक, कवी व साधकवृंद आले आहेत. या संमेलनाचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आजी-माजी मंत्री व भाजपचे पदाधिकारी यांंच्या उपस्थितीत होणार आहे.

स्वामींच्या दूरदृष्टीमुळेच आज स्त्री – पुरुष समानता: डॉ. पवार

श्री चक्रधर स्वामींच्या दूरदृष्टीमुळेच आज स्त्री – पुरुष समानतेचे युग दिसते, महिलांना आज सर्व क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळते आहे, कारण स्वामींनी त्या काळात समतेची युग निर्माण केले होते. श्री चक्रधरस्वामींनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांना दर्शनाचा, भक्तीचा अधिकार मिळाला पाहिजे. हा विचार स्वामींची दुरदृष्टी दर्शवितो. कारण, याच विचारांचा परिणाम म्हणजे आज अष्टशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याला संपूर्ण देशभरातून येथे उपस्थित झालेल्या नारीशक्तीचे दर्शन आपल्याला घडत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येथे केले.

फडणवीस आज नाशकात

या संमेलनास मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंंत्री देवेंंद्र फडणवीस सदीच्छा भेट देणार आहे. दुपारी दोनला त्यांचे संमेलन स्थळी आगमन होईल. साडे तीन पर्यंत ते संमेलनात सहभागी होणार आहे. राज्यात पुनश्च सत्तेवर आल्यानंतर त्यांचा हा पहीलाच दौरा असल्याने संयोजक व भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांत उत्सहाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी पदाधीकारी सज् झाले आहेत. यावेळी संयोजकांतर्फे विविध मागण्या मांडल्या जाणार आहे. त्यात फडणवीस त्यांच्या पदारी काय टाकतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या