आज पासून भगवान ऋषभदेवांचा महामस्तकाभिषेक सोहळा

आज पासून भगवान ऋषभदेवांचा महामस्तकाभिषेक सोहळा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बागलाण तालुक्यातील ( Baglan Taluka ) मांगी-तुंगी ( Mangi Tungi ) येथील भगवान वृषभदेव ( Lord Vrushabhdev )यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यात प्रत्येक दिवशी भविकांद्वारे सौभाग्यशाली महामस्तकाभिषेक रोज सकाळी 7:30 पासून सुरु होईल. त्यानंतर दुपारी ऋषभदेवपूरम मांगीतुंगी येथे विधान पूजन व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दि. 15 जूनपासून सलग 15 दिवस हा महाभिषेक सोहळा सुरू राहणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. प्रति सहा वर्षांनंतर या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

मूर्ती निर्माण कमेटीद्वारे यात्रेकरूंना डोंगरावर नेण्यासाठी 8 नवीन बोलेरो फोरव्हीलर गाड्या घेण्यात आलेल्या आहेत. ऋषभदेवपूरम येथे 81 फूट उंच गुलाबी दगडापासून सर्वतोभद्र प्राचीन महल निर्माण करण्यात आलेले आहेत. ऋषभदेवपूरम जवळ व मूर्ती निर्माण कमेटी अंतर्गत भरतचक्रवर्ती उद्यानामध्ये भगवान भरत स्वामीची 10 फूट उंचीची पद्मासन प्रतिमा स्थापित केली जाणार आहे.

सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आजपासूनच तैनात झाला आहे. संपूर्ण महामस्तकाभिषेक व्यवस्थेवर मूर्ति निर्माण कमेटीचे अध्यक्ष व अांतरराष्ट्रीय अभिषेक महोत्सवाचे अध्यक्ष पीठाधीश रवीन्द्रकीर्ति स्वामीजी लक्ष ठेऊन आहेत.

समितीचे महामंत्री संजय पापडीवाल, कार्याध्यक्ष अनिलकुमार जैन, अधिष्ठाता सी. आर. पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद जम्मानलाल कासलीवाल, भूषण जयचंद कासलीवाल, डॉ. जीवनप्रकाश जैन, विजयकुमार जैन, नरेश बन्सल, चंद्रशेखर कासलीवाल, राजेंद्र कासलीवाल त्यासाठी परीश्रम घेत आहेत. कमेटीद्वारे 2016 मध्ये प्रत्येक सहा वर्षांनी महामस्तकाभिषेक सोहळा होईल, असे घोषित करण्यात आले होते.

त्यानुसार 2022 मध्ये प्रथम महामस्तकाभिषेक सुरु होत आहे. या महोत्सवाचे ध्वजारोहण बुधवारी सकाळी कमल ठोलीया यांच्या हस्ते व प्रथम कलश पूजन जम्बूप्रसादजी जैन हे करणार आहे. द्वितीय कलश विद्याप्रकाश, संजय जैन, अजय जैन, दिवान हे करणार आहेत. या महोत्सवासाठी आर्यिका ज्ञानमती माताजी, डॉ. प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी यांचा ऑनलाईन सहभाग असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com