Friday, April 26, 2024
Homeजळगावखडसे, उध्दवांना महाजनी टोला

खडसे, उध्दवांना महाजनी टोला

जळगाव jalgaon

पुर्वाश्रमीचे भाजपचे आणि आताचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ट आमदार एकनाथराव खडसे, (Eknathrao Khadse,)माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वादाची ठिणगी विझण्याची शक्यता तशी कमीच. त्यामुळे वेळ आणि संधी मिळताच हे ज्येष्ट नेते एकमेकांना शाब्दीक टोले (LiteralTola) लगावण्यात मागे हटत नाहीत. अशातच मंत्री महाजन यांनी आ. खडसे व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना महाजनी टोला लगावला आहे. हे कसले लोकप्रतिनिधी असा टोला आ. खडसेंना तर काय होतास तू काय झालास तू अशा शब्दात उध्दव ठाकरे यांना महाजनी टोला लगावला आहे.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवांशासाठी ही बातमी आहे महत्त्वाची : अनेक रेल्वेगाडया रद्दप्रियकरासह तिघांच्या मदतीने काढला पतीचा काटा

खडसेंची लक्षवेधी पण कारवाईनंतर दबाब

या अधिवेशनात आ.एकनाथराव खडसे यांनी अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी मांडली याबाबत विचारले असता, आ.खडसेंच्या लक्षवेधीनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. मात्र, कारवाई केल्यानंतर माझ्या लोकांवर का कारवाई केली? त्यांना का पकडले? असा जाब पोलिसांना फोन करून विचारला. एकीकडे लक्षवेधी मांडायची, सभागृहात भाषणे करायची अन कारवाई झाल्यानंतर पोलिसांवर दबाब आणायचा, धमकवायचे हे कसले लोकप्रतिनीधी आहे? असा टोला त्यांनी लगावला.

गद्दारांना जागा दाखविण्याची आली वेळ! पोटच्या मुलाचा केला खून, आईसह भाच्याला झाली जन्मठेप

उध्दव ठाकरेंना उशिरा सुचले शहानपण

उध्दव ठाकरे खेड येथे महागाईच्या मुद्द्यावर सभा घेणार आहे, याबाबत ना.महाजन यांना विचारले असता,उध्दव ठाकरे अडीच वर्ष घरात बसले होते.त्यांना महागाई दिसत नव्हती. आता ते बाहेर पडताहेत, त्यांना उशिरा सुचलेले शहानपण आहे. उध्दव ठाकरेंची स्थिती आता काय होतास तु काय झालास तू, अशी झाली आहे. पक्षाच्या लोकांनी त्यांना शिवसेनेतून बाहेर काढले आहे. एकदा संधी मिळाली होती; पण त्यांनी त्याची माती केली, असा टोला त्यांनी लगावला. खासदार संजय राऊत यांच्याबद्दल ते वाचाळविर असून अजून त्यांचा तोल जाईल, असाही टोला ना.गिरीश महाजन यांनी लगावला.

बनावट वेब साईटच्या माध्यमातून व्यापार्‍याला दिड लाखांचा गंडा

कापुस उत्पादक शेतकर्‍यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार

कापूस दरांबाबत शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 12 हजार प्रतिक्विटलपर्यंत गेलेले भाव सध्या अांतराष्ट्रीय बाजार पेठेच्या परिणामामुळे 7700 ते 7800 रुपयांपर्यंत आहे. खते, बियाणे व मशागतीच्या तुलनेत हे भाव कमी असले तरी सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असून आगामी तीन आठवड्यात अधिवेशनामध्ये कापसू उत्पादक शेतकर्‍यांबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी दिली.

जिल्हा परिषदेतर्फे जिल्हाभरातील तीन वर्षातील आदर्श ग्रामसेवकांना जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात शनिवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून गौरव करण्यात आले. त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कापसाला देण्यात येत असलेला भाव कमी असला तरी कापूस उत्पादक शेतकर्‍यांबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या