अजित पवारांची प्रतिमा उजळविण्यासाठी ६ कोटींची तरतूद
अजित पवार

अजित पवारांची प्रतिमा उजळविण्यासाठी ६ कोटींची तरतूद

१२०० कर्मचारी असतांना बाहेरच्या संस्थेकडे काम

मुंबई

कोरोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाटच आहे. विकासकामांवरील निधीला कात्री लावली जात आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी तब्बल सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अजित पवारांचे सचिवालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयसोबत चर्चा केल्यानंतर एजन्सीची निवड केली जाणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात १२०० कर्मचारी आहेत आणि या विभागाला वर्षाला १५० कोटींचा निधी दिला जातो. त्यानंतर हे काम खाजगी संस्थेकडे द्यावे लागत आहे.

अजित पवार
अखेरी राज्यातील लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवला

माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात सोशल मीडिया हाताळणाऱ्या तज्ज्ञ लोकांची कमतरता आहे. यामुळे हे काम खासगी कंपनीकडे दिले असल्याचे आदेशात कारण देण्यात आले आहे. अजित पवारांकडे असलेल्या उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क या खात्यांबाबतचे निर्णय, आदेश आदींची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी कंपनी नियुक्ती केली जाणार आहे. या कंपनीला या कामासाठी ६ कोटींचा निधी दिला जाणार आहे. ही कंपनी अजित पवारांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम आदी सांभाळणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि संदेश पाठविण्याचे कामही ही कंपनीला दिले जाणार आहे. पवारांचे सचिव, जनसंपर्क विभागाशी चर्चा झाल्यानंतर हे काम या कंपनीकडे दिले जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनताही अजित पवारांकडे त्यांच्या तक्रारी मांडू शकतील, त्याचेही काम या कंपनीकडे देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे कामही खासगी संस्थेकडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियाचे कामही गेल्या वर्षीच एका खासगी एजन्सीकडे दिले होते. यासाठी ई-टेंडरिंगची प्रक्रिया राबविली होती.

भाजपकडून टीका

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरला व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एनज्सी तात्काळ रद्द करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. “लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा PR झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? करोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल,” अशी टीका त्यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com