सैन्य दलात नोकरीस लावून देण्याचे तोतयाकडून आमिष; 'इतक्या' लाखांची फसवणूक

सैन्य दलात नोकरीस लावून देण्याचे तोतयाकडून आमिष; 'इतक्या' लाखांची फसवणूक

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

तोतया आर्मी अधिकारी असल्याचे भासून भारतीय सैन्य दलात नोकरीस लावून देतो अशी खोटी बतावणी करून तरुणांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे...

याबाबत गणेश सुकदेव नागरे (रा. पाचोरे, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत बापू छबु आव्हाड (रा. आंबेगाव व त्याच्या तीन साथीदारांनी गणेश व त्याचा मित्र आकाश रामनाथ यादव (रा. शिरवाडे) यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर संगनमताने सैन्य दलात नोकरीस लावून देतो, असे सांगून सैन्य दलातील गणवेश घालून खोटे ओळखपत्र दाखवून सैन्य दलातील सेवक असल्याचे भासवून नागरेकडून 5 लाख 45 हजार तर त्याचा मित्र यादव कडून 5 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसणूक केली.

सैन्य दलात नोकरीस लावून देण्याचे तोतयाकडून आमिष; 'इतक्या' लाखांची फसवणूक
नाशिक तालुका : १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे निकाल जाहीर, कोण झाले विजयी?

या प्रकरणी चार जणांविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com