लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे उपसेनाप्रमुख

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या निधनाला एक महिना उलटला आहे. मात्र केंद्र सरकार (Central Government) अद्याप नवीन सीडीएसबद्दल (CBS) निर्णय घेऊ शकलेले नाही. सरकारकडून या शोधात लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. आता केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Manoj Pande) यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे…

जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.

पांडे यांनी ३७ वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या काळात ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. जनरल पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्ती झाली.

लेफ्टनंट जनरल पांडे यांनी १ जून रोजी इस्टर्न आर्मी कमांडचे नवीन कमांडर (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) म्हणून पदभार स्वीकारला. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी पांडे तैनात होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *