Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यालेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर (Lt. Gen. Dr. Madhuri Kanitkar) यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (Maharashtra University of Health Sciences, Nashik) नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्या वेळापूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली…

- Advertisement -

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर (Lt. Gen. Dr. Madhuri Kanitkar) यांची नियुक्ती जाहीर केल्यानंतर लगेचच याबाबतची माहिती त्याच्याकडून देण्यात आली आहे.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.

कोण आहेत ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर ?

ले. ज. डॉ माधुरी कानिटकर यांचा जन्म जन्म १५ ऑक्टो १९६० रोजी झाला. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. बालरोगशास्त्र या विषयात त्या एमडी आहेत.

२०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे. अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची यशोगाथा; वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

- Advertisment -

ताज्या बातम्या