Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची यशोगाथा; वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची यशोगाथा; वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS-) कुलगुरूपदी (Vice-Chancellor) लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Dr. Madhuri Kanitkar ) यांची निवड झाली. कोण आहेत डॉ. माधुरी कानिटकर? याची माहिती जाणून घेऊ या…

- Advertisement -

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Dr. Madhuri Kanitkar ) भारतीय लष्करातील डॉक्टर असून २९ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत. तीन स्टार रँन्क मिळालेल्या त्या देशातील दुसऱ्याच महिला आहेत.

त्यांनी नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून पदभार स्वीकारला.त्यापूर्वी कानिटकर पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या. या पदावरील त्या पहिल्या महिला होत्या.

कानिटकर या पुणे येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये डिन होत्या. सध्या त्या इंटीग्रेटेड डिफेन्स स्टॉपच्या (Medical) उपप्रमुख म्हणून कार्यरत आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विज्ञान तंत्रज्ञान व संशोधन संस्थेच्या वैद्यकीय सल्लागार समितीवर त्या आहेत.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू

पुण्यात शिक्षण

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Dr. Madhuri Kanitkar ) यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. तर वैद्यकीय शिक्षणासाठी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश घेतला.

एम.बी.बी.एस. च्या तिन्ही टप्प्यात पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर त्यांनी लखनौ येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. एम.डी.(शिशुरोग तज्ञ) ही पदवी त्यांनी मुंबईमधून घेतली.

तर पीडीयाट्रिक नेफ्रॉलॉजीचे प्रशिक्षण ए.आय.आय.एम.एस., नवी दिल्ली येथून पूर्ण केले. त्यांनी एम.बी.बी.एस., एम.डी.(शिशुरोग तज्ञ), डी.एन.बी.(शिशुरोग तज्ञ), फेलोशिप पीडीयाट्रिक नेफ्रॉलॉजी असे शिक्षण घेतले आहे.

देशातील पहिल्या पीडीयाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट

डॉ.कानिटकर भारतीय लष्करातील पहिल्या प्रशिक्षित पीडीयाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट आहेत.पुणे आणि दिल्ली येथे त्यांनी मूत्रपिंडांच्या विकारांवर उपचार करणारी केंद्रे उभारली. सिंगापूर तसेच रॉयल कॉलेज, इंग्लंड येथून त्यांनी या विषयातील विशेष प्रशिक्षण घेतले आहे. ए.एफ.एम.सी. मध्ये सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि शिशुरोग विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक विद्यापीठात परीक्षक म्हणूनही काम केले आहे.

अनेक शोधनिंबध

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Dr. Madhuri Kanitkar ) यांचे यांनी विविध क्रमिक पुस्तकात १५ प्रकरणे लिहिली आहेत. तसेच त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. २०१७ मध्ये ए.एफ.एम.सी. मध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्यावर तेथे वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले.

पती लष्करात लेफ्टनंट जनरल

डॉ.कानिटकरांचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर (Lt Gen Rajeev Kanitkar) हे सुद्धा लष्करात अधिकारी होते. ते परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, सेवा पदक विजेते आहेत. तीन स्टर रँन्क पदापर्यंत पोहचणारे हे एकमेव दाम्पत्य आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या