दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

दिलासादायक! एलपीजी गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही दिवसापासून देशात महागाईने (inflation) शिखर गाठले आहे. तर इंधनाचे (Fuel) दर मागील काही दिवसापासून स्थिर आहेत.यातच आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी जनतेला मोठा दिलासा मिळाला असून एलपीजी (LPG) सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. ही दरकपात फक्त व्यावसायिक सिलिंडरवरच करण्यात आली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही...

नव्या दरानुसार आजपासून दिल्लीत (Delhi) एक १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर ९१.५० रुपयांनी, कोलकात्यात (Kolkata) १०० रुपयांनी, मुंबईत (Mumbai) ९२.५० रुपयांनी तर चेन्नईमध्ये (Chennai) ९६ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

तसेच मागील काही काळापासून एलपीजी सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे. याआधी १९ मे २०२२, १ जून २०२२, १ जुलै २०२२, ६ जुलै २०२२ आणि १ ऑगस्ट २०२२ रोजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, ६ जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसून सिलिंडर अजूनही त्याच किमतीत मिळणार आहे. तर इंडेन गॅस सिलिंडरची (Inden gas cylinder) किंमत दिल्लीत १०५३ रुपये, तर कोलकात्यात १०७९ रुपये, मुंबईत १०५२ रुपये, चेन्नईमध्ये १०६८ रुपये असणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com