
दिल्ली | Delhi
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol-Disel) आदींच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाच एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती (LPG price hike) वाढल्याने महागाईत आणखी भर पडली आहे.
प्रति सिलिंडर १०२.५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही दर वाढ घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झाली नसून ती व्यावसायिक सिलिंडरच्या (Commercial LPG cylinder ) दरात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून भाव स्थिर आहेत.
व्यवसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने भाववाढ सुरूच आहे. गेल्या एक मार्चला व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल २६८.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर आज पुन्हा एकदा व्यवसायिक सिलिंडर १०२.५० रुपयांनी महागला आहे. नव्या दरानुसार आता व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर २ हजार २५३ रुपयांवर पोहोचले आहेत.