आजपासून गॅस सिलेंडर, बँकांसाठी हे नवीन नियम

गॅस सिलेंडर
गॅस सिलेंडर

नवी दिल्ली:

एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरसाठी नवीन नियम लागू केला आहे. या नियमाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. तसेच राष्ट्रक़ृत बँकांच्या वेळेतही बदल केला आहे.

1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडर्सची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख होण्यासाठी तेल कंपन्यांकडून नवीन एलपीजी सिलेंडरची सिस्टम लागू केली जाणार आहे. सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC (Delivery Authentication Code) असे नाव देण्यात आले आहे. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. सुरुवातीला हा प्रयोग 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल.

मोबाइल क्रमांक अपडेट शक्य

जर एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर डिस्ट्रिब्युटरकडे अपडेट केला नसेल, तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक App असेल. ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षणीच तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता आणि ज्यानंतर कोड मिळेल.

बँका आता ९ ते ४

आजपासून राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. आता बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत सुरू राहतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकाना हा नियम लागू असेल. याबाबत काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयानं सूचना दिल्या होत्या. तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियानं बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. ०.25 टक्क्यांच्या कपातीनंतर आता व्याजदर 3.25 टक्के असणार आहे.

पैसे भरणे व काढण्यासाठी शुल्क

बँक ऑफ बडोदा आता पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी देखील शुल्क आकारणार आहे. ठाराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढल्यास ग्राहकांना शुल्क भरावं लागणार आहे. लोन खात्यासाठी तीनपेक्षा जास्त वेळा रक्कम काढल्यास 150 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर बचत खात्यामध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळाच पैसे जमा करता येणार आहे. चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना 40 रुपये मोजावे लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com