भोंग्यांचे राजकारण संविधान विरोधी- केंद्रीय राज्यमंत्री आठवले

भोंग्यांचे राजकारण संविधान विरोधी- केंद्रीय  राज्यमंत्री आठवले

देवळाली | कॅॅम्प Deolali Camp

देशाचा कारभार संविधानाने चालतो त्यामुळे कोणी भोंगे काढा,भोंगे वाजवा असे वत्क्व्य करून समाजासमाजात दुही निर्माण करू नये. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale )यांनी देवळाली कँम्प येथे केले.

देवळाली कँम्प रिपब्लिकन पक्षाच्या( RPI- Deolali Camp ) वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सभेत नामदार आठवले बोलत होते .अध्यक्षस्थानी रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे होते.यावेळी नामदार आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारयला तयार आहोत शिवाय आपला प्रवास पँँथर ते रिपब्लिकन पार्टी असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाई च राहू.

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यास विरोध नाही धर्मा धर्मात तेढ निर्माण करू नये.भगवा रंग गौतम बुध्दांचा आहे बुद्ध व भगवा रंग शांततेचा आहे.राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालीमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम करावे.अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचेही भाषण झाले.स्वागत रॉकस्टार राहुल साठे यांच्या गिताने झाला.

यावेळी अमोल पगारे,चंद्रकांत भालेराव,सिद्धार्थ पगारे,आर डी जाधव,अशोक साळवे,गौतम भालेराव, संतोष कटारे, पंडित साळवे,सुभाष बोराडे,गौतम पगारे,संजय भालेराव,भाऊसाहेब धिवरे, प्रभाताई धिवरे,विश्वनाथ काळे,सुरेश निकम,नितीन साळवे,योगेश लोखंडे,राजू वाघमारे,राकेश भालेराव,संतोष गायकवाड, जयंतीभाई गडा,भगवान कटारिया, आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.