राज्यात सिगारेट विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी; काय आहेत आरोग्य विभागाचे आदेश? जाणून घ्या

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई : Mumbai

राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

यानुसार सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विडी आणि सिगारेटचे संपूर्ण पाकिट विकणे बंधनकारक राहणार आहे. टपरी किंवा अन्य कोणत्याही दुकानात विडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही.

महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावर आळा घालण्यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत.

यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली होती.

सिगारेटचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नुकसान याची माहिती सिगारेटच्या पाकिटावर छापलेली असते. हा ‘वैधानिक’इशारा सिगारेट शौकीन मनावर घेत नाहीत.

एक किंवा दोन अशा सुटय़ा स्वरूपात सिगारेट्सची जेव्हा विक्री केली जाते तेव्हा त्या विकत घेणाऱ्याला अशा प्रकारची कोणतीही सूचना किंवा ‘वैधानिक इशारा’ लेखी स्वरूपात देता येत नाही. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयामुळे या सगळ्याला आळा बसण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *