
शहापूर | Shahpur
शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधव यांच्या विविध मागण्यांसाठी दिंडोरी येथून पायी लॉन्ग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. बुधवारी सरकारतर्फे मंत्री दादा भुसे, अतुल सावे आणि अभिमन्यू पवार यांची शेतकरी शिष्टमंडळासोबत बैठक झाली...
तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीनंतरही काहीच तोडगा निघाला नाही. यामुळे आता हा मोर्चा मुंबईवर धडकणार आहे. मोर्चा थांबविण्यास शेतकऱ्यांनी बुधवारी नकार दिला. आज दुपारी तीन वाजता लॉंग मार्चच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या अतिथी कक्षात बैठक होणार आहे.
बैठक सुरू झाली तरी मोर्चा थांबणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या बैठकीमध्ये तरी शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.