नाशिकमधील निर्बंध शिथीलनंतरचा पहिला दिवस...पाहा परिस्थिती

नाशिकमधील निर्बंध शिथीलनंतरचा पहिला दिवस...पाहा परिस्थिती

नाशिक

करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आलेख खालावल्याने आजपासून नाशिक जिल्ह्याला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने नाशकात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतरच्या आज पहिल्या दिवशी बाजार गजबजला. तब्बल दिड महिन्यानंतर आज दुकाने उघडली.

मंगळवारी सकाळी सात वाजेपासून व्यापाऱ्यांनी आपले दुकाने उघडली. त्यानंतर बाजारातील वर्दळ वाढू लागली. नाशिक जिल्ह्यातील कपड्याचे दुकाने, सराफ व्यवसायकांचे दुकाने सुरू झाली. नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असतानाही नियमितपणे सुरू ठेवलेल्या चाचण्या तसेच योग्य वेळी लागू केलेला लॉकडाऊन यामुळे रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. यामुळे या सवलती दिल्या आहेत. शुक्रवारपर्यंत याचा आढवा घेण्यात येणार असून रुग्णसंख्या वाढली तर सवलती मागे घेण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

नाशिकमधील निर्बंध शिथीलनंतरचा पहिला दिवस...पाहा परिस्थिती
HSC Exam : सर्वोच्च न्यायालयात आज काय झाले ?

काय आहेत सवलती

आस्थापना दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.

भाजीपाला विक्री 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.

शिवभोजन 10 ते 2 पार्सल सेवा सुरू राहणार.

अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी.

दुपारी 3 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी बंदी लागू राहणार

अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यासाठी परवानगी नाही.

शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहतील.

बँक सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार.

15 जूनपर्यंत निर्बंध लागू राहणार.

सलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यावसायिकांची दुकानं उद्यापासून सुरू होणार.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com