Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआरोग्य मंत्री म्हणाले, लॉकडाऊन वाढवण्याकडे मंत्रिमंडळाचा कल

आरोग्य मंत्री म्हणाले, लॉकडाऊन वाढवण्याकडे मंत्रिमंडळाचा कल

मुंबई

राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत नसल्यामुळे ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध वाढवण्याकडे मंत्रिमंडळाचा कल आहे. त्यासंदर्भात आज चर्चा झाली. त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

गृहमंत्र्यांचा निर्णय : PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांचे जूनपासून प्रशिक्षण

१५ मे रोजी ब्रेक द चेन अंतर्गत असलेली कडक निर्बंध नियमावलीचा कालावधी संपत आहे. त्यामुळे ठाकरे सरकार इथून पुढे ही लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली . त्यावर अनेक सदस्यांनी लॉकडाऊन वाढवण्याकडे कल दिला. कारण लॉकडाऊनंतर राज्यातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

राज्यात रुग्ण वाढीचा दर घसरत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. म्युकरमायसोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

लसीकरण ४५ + गटासाठी

४५ + गटाचे लसीकरण ही केंद्राची जबाबदारी आहे. परंतु केंद्राकडून लस पुरवठा होत नाही. यामुळे ४५ + वरील लोकांचे दुसरे डोस प्रलंबित आहे. त्यामुळे राज्याने खरेदी केलेली लसही ४५ + गटाकडे वर्ग करण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल.

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

का वाढणार लॉकडाऊन

१). गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या कमी झाली नाही. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली.

२) रुग्णसंख्या वाढल्यावर आरोग्य सुविधांवर ताण आला. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला. तसेच रुग्णालयातील बेड कमी पडू लागले.

३) राज्यात लसीकरणावर भर देऊन जास्तीत जास्त व्यक्तींना सुरक्षित करणे आवश्यक असताना लसींचा कमी पुरवठा होत असल्याने राज्यातील लसीकरणाची गती कमी झाली.

४) देशात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

५) राज्यात लॉकडाऊन असतानाही सुमारे १३ जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाला लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घ्यावा लागला. यावरुन राज्यातली कोरोनाची स्थिती गंभीरच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या