Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे म्हणाले, विराेधी पक्षनेतेपदाचे दिवस साजरे हाेत आहेत

ठाकरे म्हणाले, विराेधी पक्षनेतेपदाचे दिवस साजरे हाेत आहेत

मुंबई। Mumbai

महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षांचे आहे. सोबत जे अपक्ष आहेत त्यांचे सरकार आहे. त्याला आता सहा महिने पूर्ण झाले. पूर्वी एक महिना झाला. सहा महिने झाले की हे सरकारचे वाढदिवस धूमधडाक्यात साजरे केले गेले. आता विरोधी पक्षनेते पदाचे दिवसही धूमधडाक्यात साजरे केले जाता आहेत, अशी बाेचरी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackre)यांनी विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. ‘सामना’त संजय राऊन यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका करत फडणवीसांच्या दाैऱ्यावर प्रश्न उपस्थित केला.

- Advertisement -

मंत्रालयात जात नसल्याचा आराेपावर मुख्यमंत्री म्हणाले, आता तंत्रज्ञान प्रगत झालेले आहे. त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच आहात. मी तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व कारभार पाहत आहे. आमदारांशी व्हिडिओ काॅन्फरन्सने चर्चा केली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. आता तंत्रज्ञानामुळे मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो.

कराेनाच्या संकटातील कामाचे काैतूक

कराेनाचे संकट आले तेव्हा सुरुवातीला मुंबई सुविधा कमी हाेत्या. त्या युद्धपातळीवर उभारल्या गेल्या. वॉशिंग्टन पोस्ट, जागतिक आरोग्य संघटना आमच्या प्रयत्नाचे काैतूक करत आहे. डब्ल्यूएचओने धारावीचा उल्लेख केला. त्यानंतर कालपरवाकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये एक आर्टिकल आले. त्यात त्यांनी म्हटले की, मुंबई हे एक असे शहर आहे ज्या शहराने कोणतीही माहिती लपवलेली नाही.आता थाेड्याफार तक्रारी आहेत. त्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत की, जिथे जिथे अशा सुविधांची गरज असेल तिथे तत्काळ या सुविधा निर्माण करा.

लाॅकडाऊन हळूहळू उठेल

लाॅकडाऊन उठवण्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सध्या लॉकडाऊन आहेच, पण आपण एक एक गोष्ट सोडवत चाललेलो आहोत. हळूहळू एक एक गोष्ट बाहेर काढतोय. नाहीतर काय होईल लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टू या गोष्टीत अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चूक आहे. घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूक आहे. लाॅकडाऊन एकदम जर घिसाडघाईने उघडले आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेला तर पोटापाण्याचं काय करणार? कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार?

घरच लाॅकडाऊन व्हायला नकाे

कराेनामुळे कुटुंबंच्या कुटुंब आजारी पडताहेत आणि मृत्युमुखी पडताहेत. मग कुटुंबं मृत्युमुखी पडल्यावर घराला जे टाळे लागेल ते लॉकडाऊन कोण उघडणार? घराचं जे लॉकडाऊन होईल त्याचं काय? कुटुंबच्या कुटुंब जर गेले तर त्या घराचे टाळे कोण उघडणार? ग्रामीण भागात जिथे जिथे शाळा असेल तिथे शाळा सुरू कराव्यात का? आणि जिथे जिथे शक्य आहे, सुविधा आहेत तिथे ऑनलाइन शिक्षण सुरू करावे. अंतिम वर्षाची परीक्षेचा विषय जेव्हा शक्य हाेईल, तेव्हा घेऊ. ताेपर्यंत सरासरी गुणे देऊन निकाल जाहीर करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या