लॉकडाऊनचे हे भन्नाट मीम्स होतायत व्हायरल

लॉकडाऊनचे हे भन्नाट मीम्स होतायत व्हायरल

सोशल मीडिया सर्वच गटातील व्यक्तींसाठी भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. कोणतेही घटना घडली तर नेटीजन्सकडून मजेदार मीम्स व्हायरल होतात. मग गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनची चर्चा सुरु असतांना काल त्याची घोषणा झाली. मग या विषयावरभन्नाट मीम्मचं व्हायरल होताना दिसतायत. व्हॉट्सऍप, फेसबुक, टि्वटर सर्वीकडे नेटीजन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मग त्याला प्रेक्षक खळखळू दादा देत आहे.

............ चेक द ब्रेन ...........

मागील वर्षांपासून आत्तापर्यन्त जेव्हढे असले कागद ज्याला सरकारी भाषेत आदेश म्हणतात त्याचे सरकारने एक पुस्तक छापून यावरच MPSC आणि UPSC परीक्षा घ्यायला पाहिजेत... लाॅकडाउन 1 ते 10,

पुनःश्च हरी ओम 1 ते 10,

अर्धवट निर्बंध 1-10,

अनलॉक 1 ते 10..

त्यातील कोणत्या तारखेला कोणते निर्बंध, त्याचा अर्थ काय...

आणि सर्वात महत्वाचा पेपर...

मुख्यमंत्री कुणाला उद्देशून काय म्हणाले...

माझे कुटुंब.. तुझी जबाबदारी असेल तर तुझे कुटुंब कुणाची जबाबदारी?...

एकही माणूस MPSC / UPSC क्लिअर होणार नाही...

वाईनशाँप.बार हाँटेल.

बंद असल्यामुळे

बायका खुश.

आणि सोन्याचांदीची.आणि साड्यांची दुकान बंद.

असल्यामुंळे नवरे खुश.

आणि शाळा बंद असल्यामुळे.मुले खूष.

अजून काय पाहिजे.सुखी कुटुंबासाठी

थोडक्यात सांगायचे तर ...

शिव भोजन खायला बाहेर पडलो आहे .....

आणि ...

शिव भोजन करून घरी निघालो आहे ...

ही दोन करणे सांगून आपण कुठेही फिरू शकतो

सगळं बंद करणार नाही.

थोडं उघडं ठेवणार..

पण उघडं ठेवणार म्हणजे सगळं उघडं असेल असं नाही काही काही बंद पण असेल..

आपण यापुर्वी काही वेळा रात्री बंद करत होतो,कधी दिवसा बंद करीत होतो पण कधीही बंद असलं तरी तुमची गैरसोय होऊ देणार नाही,थोडं उघडं राहीलच...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com