जिल्ह्यात आजपासून कडक लाॅकडाऊन

अत्यावश्यक कारण वगळता घराबाहेर पडणे टाळा; जिल्हाप्रशासनाचे सहकार्याचे आवाहन
जिल्ह्यात आजपासून कडक लाॅकडाऊन

नाशिक । प्रतिनिधी

करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात आज दुपारी बारा वाजेपासून दहा दिवसासाठी कडक लाॅकडाऊन लागू आहे. भाजीपाला विक्रीसह दूध व इतर सेवांबाबत जनसामान्यात गोंधळाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर काय सुरु व काय बंद राहील याबाबत नागरिकांचे प्रश्न व त्याची उत्तरे. दरम्यान, अत्यावशक कारण वगळता घराबाहेर पडू नका असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे.

१) रिक्षा सुरु राहातील का?

- वैद्यकीय कारणासाठी इमर्जन्सीमध्ये रिक्षेचा वापर करता येईल.

२) भाजीवाले हातगाडीवर भाजी विकू शकतील का?

- महापालिका भाजीपालाविक्रिसाठी विक्री केंद्र जागा ठरवून देतील. त्या ठिकाणी आखून दिलेल्या वर्तुळात ठरवून दिलेल्या वेळेत भाजी विकता येईल. तसेच हातगाडी वर देखील भाजी विक्री करता येईल. पण करोना सुरक्षा नियम उल्लंघन होता कामं नये.

४) सर्वानाच घरपोच दूध कसे मिळेल?

- शक्यतो दूध विक्रेत्यांनी घरपोच जाऊन दूध द्यावे.

५) लस घेण्यासाठी बाहेर पडता येईल का ?

- लस घेण्यासाठी नागरिकांना बाहेर पडता येईल. पण लसीकरणासाठी मॅसेज आला असेल तरच जावे. विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

६) पेट्रोल,डिझेल भरता येईल का ?

- अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन उपलब्ध होईल. त्यासाठी अोळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल.

७) जेवणाचे डब्बे घरपोच करता येईल का ?

- स्वयंसेवीसंस्थाना गृह विलगीकरणातील करोना रुग्ण व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी डब्बे घरपोच पोहचवता येतील.

८) एमआयडिडीसी मध्ये कामावर जाता येईल का ?

- ज्या कंपन्या सुरु असतील किंवा अत्यावश्यक सेवेच्या उत्पादनाशी निगडित असतील तेथील कर्मचारी व कामगारांना कामावर जाता येईल. सोबत अोळखपत्र बाळगणे गरजेचे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com