Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'एलसीबी'च्या 'पीएसआय'ने मागितली चार लाखांची लाच; 'एसीबी'ची मोठी कारवाई

‘एलसीबी’च्या ‘पीएसआय’ने मागितली चार लाखांची लाच; ‘एसीबी’ची मोठी कारवाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नुकतीच कार्यकारी अभियंता (Educative Engineer) यांच्या जलसंपदा विभागातील (Irrigation Department) दोन लिपिक (clerk bribe case) लाच स्वीकारताना जाळ्यात सापडल्याची घटना ताजी असताना आता नाशिकमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक (Local crime branch PSI) व एका खासगी व्यक्तीस तीन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti corruption bureau ) अटक करण्यात आली आहे….

- Advertisement -

महेश वामनराव शिंदे (वय ३८) असे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहिती नुसार आयपीएलच्या सट्टयाप्रकरणी (IPL Betting) कारवाई न करणे आणि सट्टा सुरळीत सुरु ठेवणे यासाठी पीएसआय असलेल्या शिंदे याने संजय आझाद खराडे नामक एका खासगी व्यक्तीच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात शनिवारी (दि २५) रोजी चार लाखांची लाच मागितली होती.

यानंतर तडजोडीअंती आज (दि ३०) रोजी तीन लाख रुपये लाच देण्याचे ठरले होते. दरम्यान, याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, आज नाशिकच्या एसीबीने (ACB) सापळा रचला आणि खासगी व्यक्ती असलेल्या संजय खराडे यास लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यावेळी चौकशीकेली असता ही लाच पीएसआय शिंदे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे समोर आले आहे.

यावेळी सापळा पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्रचे सुनील कडासने व प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिकचे सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, सह अधिकारी पोलीस अधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांच्यासह पो.हवा. प्रफुल्ल माळी, पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रभाकर गवळी, पो.ना. प्रवीण महाजन, पो.ना. शिरीष अमृतकर व चालक पो.हवा. संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक- ला.प्र.वि., नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या