Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याखुशखबर | कर्जदारांना मोरॅटोरियम काळातील रकमेवरील चक्रव्याढ व्याज मिळणार परत

खुशखबर | कर्जदारांना मोरॅटोरियम काळातील रकमेवरील चक्रव्याढ व्याज मिळणार परत

नवी दिल्ली | New Delhi प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसलेल्या कर्जदाराला केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. दिवाळीच्या आधी चांगली बातमी केंद्राने आज देऊ केली आहे.

- Advertisement -

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोरॅटोरियम काळातील व्याज रकमेवरील चक्रव्याढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला असून यासंबंधीची नियमावली जाहीर केली.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा दोन कोटींपर्यंतच्या कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना मिळणार असल्याचे समजते.

दोन कोटींचं कर्ज असणारे कर्जदार ज्यांनी मार्च ते ऑगस्ट असे सहा महिने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती त्यांची चक्रव्याढ व्याज रक्कम परत केली जाणार असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

यानुसार, १४ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी सुनावणी करताना सरकारला लवकरात लवकर पावले उचलण्याचा आदेश दिला होता.

अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाचा फायदा लघू, लघू व मध्यम, शैक्षणिक, गृह, क्रेडिट कार्ड, ऑटोमोबाइल, वैयक्तिक, व्यवसायिक कर्जदारांना होणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, २९ फेब्रुवारीपर्यंत कर्जदाराची थकबाकी दोन कोटींच्या पुढे असता कामा नये.

माफ करण्यात आलेली चक्रव्याढ व्याज रक्कम संबंधित बँकांकडून खातेदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. ही रक्कम ५ नोव्हेंबर किंवा त्याच्या आधी कर्जदाराच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या