Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यापाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत चैतन्य

पाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत चैतन्य

देवळाली । वार्ताहर | Devalali

‘दिवाळी सण (diwali festival) मोठा, नाही आनंदाला तोटा’ अशी म्हण प्रचलित आहे. गरिबातील गरीब व्यक्ती हा सण दरवर्षी मोठ्या आवडीने साजरा करतात. प्रत्येकाच्या कुवतीनुसार खरेदी केली जाते.

- Advertisement -

यंदा कपडे, कंदील, फराळ, पणत्या या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. अशा खरेदीचा उत्साह आता शिगेला आहे. खरेदीसाठी ग्राहकांकडून मॉल्सला पसंती दिली जात आहे. हा मॉलखरेदीचा ट्रेण्ड शहरातील दुकानदारांना मारक ठरला आहे. विशेषत: कपडे विक्री करणार्‍या दुकानदारांना याचा फटका जास्त बसला आहे.

लक्ष्मीमूर्ती

लक्ष्मीपूजनासाठी (Laxmipujan) बाजारात अनेकविध आकारातील आकर्षक लक्ष्मी मूर्ती (Lakshmi idol) विक्रीस आल्या असून यंदा भाव चांगलेच वधारले आहेत. बाजारात दाखल झालेल्या लक्ष्मी मूर्तींमध्ये सजावटीवर अधिक दिसून येतो. पूर्वी मातीची एकच साचेबद्ध डोक्यावर दिवे असलेली मूर्ती बाजारात दिसायची. आता मात्र या मूर्तींमध्ये वैविध्य दिसून येते. यामध्ये कमळारूढ, सिंहासनस्थ, उभी अशा लक्ष्मी मूर्ती दिसतात. त्यासोबत मूर्तीच्या सजावटीवर भर देण्यात येतो. लक्ष्मीच्या डोक्याला गंगावन, डोक्याला बिंदी, कानातले, नाकातले खरोखरचे दागिने, साडीवर टिकल्या जरी लावून केलेले काम अशा विक्रीस असून, त्यांची किंमत अधिक आहे. मात्र आकर्षक असल्याने त्यांना मागणीही चांगली आहे.

रांगोळी

रांगोळीचे (Rangoli) पाकीट 20 रुपये तर रंगीत रांगोळीचे एक पाकीट 30 रुपये आहे. त्यात विविध रंग असून रांगोळीच्या एका गोणीमागे 25 रुपये वाढले. सफेद रंगाच्या गोणीमागे 40 रुपये भाववाढ (price increase) झाली आहे. तरीदेखील रांगोळी विकताना भाववाढ केलेली

कंदील व पणत्या

छोटे कंदील (lantern) 60 रुपये डझन, एक नग 10 रुपयांना आहे. पणतीस्टॅण्ड 100 रुपयांना असून मेणाची पणती आणि चिनी मातीच्या साध्या पणत्याही आहेत. दोन्ही प्रकारच्या पणत्यांना मागणी आहे. जेल व मेणाच्या पणत्या विकल्या जात आहेत. जेल आणि फॅन्सी पणतीची किंमत 100 रुपये आहे. कंदील 100 ते 500 दिव्यांचे तोरण 800 रु,प्रमाणे विकले जात आहे.

इकोफ्रेण्डली कंदील

प्लास्टिक व थर्माकोलबंदीमुळे बाजारात प्लास्टिक व थर्माकोलचे आकाशकंदील नाहीत. त्यामुळे कागदी कंदील व त्यावर सोनेरी किनार असे कंदील बाजारात आहेत. कागदी कंदिलांना बाजारात जास्त मागणी आहे. लोकांचा कल बदलतोय, ही समाधानकारक बाब कंदीलविक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.कागदी कंदील 200 ते रुपयांना विकला जात आहे. कंदील इकोफ्रेण्डली असले, तरी त्यात भाववाढ नाही. एकंदरीतच बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या